रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

आत्मराज







दत्त नाम घेता प्रेम दाटे उरी 
सुख डोळ्यादारी ओघळते ||
जिवलग माझा जीवाचा तो जीव
स्वानंदाची ठेव आत्मराज ||
जन्म चालवितो संकटी रक्षितो
पाठीशी राहतो सदोदीत  ||
मागीतल्यावीन दिधले अपार
जगण्याचे सार दावियले ||
तयाचा मी ऋणी आहे जन्मोजन्मी
काया ओवाळूनी टाकीयली ||
दयाळा कृपाळा विक्रांता सांभाळा
धरावे हाताला आजन्म या  ||


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in



जन्म सापडत नाही











जन्म सापडत नाही 
.
रातराणी गंध आता
मनी उमलत नाही
रंगविली स्वप्न जुनी
आता आठवत नाही

दूरवर नजरेत
सखी दु;ख पेटलेले
आतड्यात भूक अन
जन्म सापडत नाही

जीवनास माझे म्हणू
ठेवू किंवा कोपऱ्यात
गोठलेल्या वेदनेस
काही समजत नाही

कालचेच गाणे जरी
सुर हरवले आज
फुंकूनही प्राण शब्दी
अर्थ उमटत नाही

हरवली दिशा अन
दुरावली साथ तुझी
भोवताली रात दाटे
सोबतीला हात नाही

ध्यास जरी सराईचा
वाट हि सरत नाही
जडावले पाय अन
गाव ही दिसत नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

मन मी अन भास









माझे असणे माझ्या मनात
माळ खुळखुळे या गळ्यात
माझे नसणे माझ्या मनात
मान मोकळी हार मळ्यात

मी आकाशी झालो तारांगण
मी धुळीत असे इवला कण
मी उगवले हिरवे पान
मी वणवा जाळतो हे रान

मन निजता देह निजतो
सारे माझेपण शून्य खातो
जाग येताच क्षणी पाहतो  
तो पाहणारा कोण असतो

एक जाणीव भरे आकाश
एक किरण पाडे प्रकाश
मन कुठले मग तयास
फक्त आहे हेच बाकी भास


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

जन्म मजकूर झाला







जन्मा आधीचे लिहिले

पत्र जीवना मिळाले

क्षणी हरवून गेले

सारे मांडले सांडले



पत्र मजकुरावीण

कोरे पांढरे उजळ

दिला दावून संतांनी

उगा मानलेला मळ



आता हसावे कुणाला

अन रडावे कुणाला

खेळ नाहीचा मांडला

नच जन्मता वाढला



दत्त आतला कळता

जन्म मजकूर झाला

नसे विक्रांत इथला

एक बुडाडा फुटला





डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://Kavitesathikavita.blogspot.in


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...