शनिवार, २ जानेवारी, २०१६

स्वप्न तुटावे म्हणून






उभा होतो एकटाच
भोवती मोकळे रान
कुणासाठी कश्यासाठी
काहीही कळल्यावीण

देहाच्या साऱ्या जाणीवा
घट्ट बोथट होवून
गेले होते का न कळे  
मन भयाने भरून  

हाक देण्यास आवाज
येत नव्हता आतून
शिवलेले ओठ कुणी
प्राण बधीर होवून

मरण नव्हते तिथे
नव्हते पण जीवन
पेटलेला दाह होता
काही जळल्यावाचून

पळायचे होते पण
आकार दिशेवाचून
थांबयालाही कुठले  
कारण नये कळून

स्वप्न असावे बहुदा
लांबले नको असून
मी लाचार भयभीत
स्वप्न तुटावे म्हणून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

शुभेच्छा

रोज भेटणाऱ्या मित्रांनो
क्वचित भेटणाऱ्या मित्रांनो
वर्षानुवर्ष न भेटणाऱ्या मित्रांनो
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा
मित्र कुठेही असोत
कसेही असोत
सदैव सुखात राहोत
हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना
खरतर मित्रांच्या प्रेमान
इतका काठोकाठ भरलो आहे
की मित्रांना दयायला
स्वतः चा उरलोच नाही
तुमचेच आहे हे प्रेम
तुम्हाला देत आहे
माझ्यातले तुमचेपण इथे
व्यक्त होत आहे 


डॉ.विक्रांत तिकोने

वळवळ








काय सर आज कुठ ?
बजेट मिटिंग !
कितवी ?
कुणास ठावूक !!
कशाला ?
का रे बाबा,आम्हीच भेटलो काय !
बर उद्या ?
उद्या परीक्षेला परीक्षक ,
नंतर ?
तेच ते नेहमीचं रिपोर्टक
गुलाम ऐ संगणक !
कधी सक्तीचा प्रेक्षक
तर कधी अंगरक्षक .
असं किती दिवस ?
नाही रे बाबा ,
यातून सुटका नाही .
राजे येतात राजे जातात
पण कायम असते बैठक !
सोडून टाका रे हे सर,
बर नाही वाटत !
जावू दे रे बाबा
हत्ती गेला
आता शेपूट राहिलं
आणि निरुपद्रवी प्राण्यांचं
शेपूटच करतं जास्त वळवळ !
म्हणायला उगा हत्तीचं म्हणायचं
पण असतं पालीचच .
फक्त टाकून पाळता येत नाही
एवढंच.
बरं चल जातो आता
खूप झाली वळवळ !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...