जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, १५ जुलै, २०१५
सोमवार, १३ जुलै, २०१५
खेळ..
जितुके मी
जवळ यावे
तितुके तू
दूर जावे
का रे असे
खेळ खेळशी
आणि कुठवर
मजला छळशी
इथे धाडसी
तिथे पाडसी
प्राण कंठात
उगा आणसी
असा सदा मी
तुज बोलावतो
व्याकूळ होत
साद घालतो
तुजला नाही
भान कश्याचे
नाट्य सदा
का दुराव्याचे
आता खेळ
असा डाव
तुच भोज्या
तुच धाव
तुच शोध
तुझा तुला
रे माझ्या
या मनातला
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
रविवार, १२ जुलै, २०१५
नकार नाही होकार नाही..
मला डोळे कळतात
प्रत्येकाच्या मनातील
भावही उमजतात
असे मी समजायचो
अन हे सारे सगळ्यांना
छातीठोक सांगायचो
पण ती भेटे पर्यंतच
कारण नंतर मग..
कशाचे काय नि कशाचे काय
मला डोंबलाचे तिचेच काय
कुणाचेच मन कळत नाही
हे अगदी स्पष्ट झाले
का ती भेटल्यापासून
माझे मनच बदलले
कळण्या न कळण्याच्या
अगदी पलीकडे गेले
कुणास ठावूक पण
ही शक्यताही अगदीच
नाकरता येत नाही .
आपलेपणानं ओथंबून
चमकणारे डोळे
मनावर प्रेमाची सावली
धरणारे डोळे
क्षणोक्षणी अस्तित्व जाणवून
देणारे डोळे
जाता जाता निमिषभर
थबकणारे डोळे
डोळ्यात डोळे मिसळता
उजळणारे डोळे
कीती शोधले पण
कधी दिसलेच नाही
बरे नाहीतर नाही
निदान दिसावेत म्हटले
सदा नाकारणारे थंड
निर्विकार डोळे
पाहूनही न पाहता दूर
वळणारे डोळे
परकेपणाची सीमारेखेत
जखडलेले डोळे
अहंकाराचा फणा ठाम
ठेचणारे डोळे
वा निकाल लावून नीप
तोडणारे डोळे
पण तसेही कधी काही
दिसले नाही मला
ते डोळे भेटायचे रोज
सुप्रभात म्हणत
बोलायचे हसायचे अगदी
फॉर्मल वागत
नकार नाही होकार नाही
आणि पाणी केवळ
राहायचे डूचमळत
वारे आले नाही
बोट हलली नाही
वादळ आले नाही
बोट बुडाली नाही
अश्याच एका दिवसानंतर
ती सुद्धा कधीच आली नाही
मला डोळे कळतात असे मग
मी कधीच म्हटले नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
करुणा
करुणा ******* करुणा दत्ताची वचने प्रेमाची रत्ने शब्दांची मनी येती ॥ दत्तकृपेचा हा भरा ये सागर लाटा लाटा वर उसळती ॥ तोच लिहवित...
-
प.प.श्री वासुदेवनंद सरस्वती महाराज **************** आनंदकंदा श्री वासुदेवनंदा तोडी भावबंधा आमच्या तू देई ज्ञान शक्ती देई भावभक्...
-
सार्थ करी दत्ता ************ विश्वाचे कारण तुच दयाघन आहे मी जाणून दत्तात्रेया परी तव कारणे केवळ जगणे मीपण सरणे घडेचिना अशी ...
-
दत्त कारणे **** घडो हे जगणे श्री दत्त कारणे अन्य न मागणे काही माझे घडावे एकदा दत्ताला भेटणे मी पण मिटने तया पायी स्वामी तो ज...
-
हट्ट *** हाच हट्ट माझा पुरा करी देवा यावे भक्तीभावा फळ माझ्या जाणतो कोरडा तूप तेलाविन आलो मी घेऊन नैवेद्य हा फुले बाजाराची...
-
मागतो मी ******** माझ्यासाठी तुझ्याकडे नच काही आराखडे जाणतो मी थकलेला रुढार्थाने सारे कसे इथे जीणे छान असे पाहतो मी भोगलेला ह...
-
कारण ****** पुन्हा जगण्याला मिळाले कारण उदयाचली त्या दिसला किरण ॥१ होती घनदाट दाटलेली निशा पुन्हा प्रकाशल्या आता दाही दिशा ॥२...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
येणेजाणे ******* आता येणे घडू नये उडणाऱ्या पाखराला आता देणे उरू नये पराधीन फकीराला ॥ देह काळा बांधलेला क्षणोक्षणी वाहू गेला कुठ...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
-
दहा दिवस सजवलेले नटवलेले नमस्कारले गणपती हळू हळू होतात विसर्जित पाण्यात लाटांच्या कल्लोळात वेगवान प्रवाहात झगमगणारी कांती लखलखणारे मुक...


