शनिवार, २१ मार्च, २०१५

स्वाईन फ्लूच बाळ






मास्क लावून मी
स्वाईन फ्लूच बाळ पाहत होतो
नाही म्हटलं तरी मनात
टेन्शनच होतं  
सर्दी पाडस झालेलं
शेंबडे पोर होतं ते
बोरातल्या तक्षकागत
मला वाटत होतं
आणि ती
कवटाळून त्याला
त्याचं रडे थांबवत होती
मास्कच काय
तिला तर
कपड्याची ही शुद्ध नव्हती
झोप न झालेली
चेहरा उतरलेली
थकलेली
दमलेली
प्रार्थना चिंता काळजीच
जणू मूर्तिमंत होती   
मरणासमोर
वाकवून मान
जणू
घे पर्याय म्हणत होती
कारण  
ती त्याची आई होती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



स्वानंदाची गुढी






स्वानंदाची गुढी
मनाचिया द्वारी
आहे उभारली  
सर्वकाळ  ||
झळाळे शिखर
विशुद्ध सुंदर
चंदेरी पदर
सौख्यदायी  ||
अवघे मालिन्य
मिटले कालचे
जगणे आजचे 
उजळले ||
उघडी कवाडे
स्वागता अंतर
सारे चराचर
सोयरे हे ||
मंगल तोरण
रंग चित्रावली
अशुभ निमाली
दु;ख चिंता ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/








शुक्रवार, २० मार्च, २०१५

काय मागू कुणास



  


  
काय मागू कुणास मी
देणारा कुणीच नाही
थांबले शोधणे अन
आशा उरलीच नाही

पळणाऱ्या पाडसाचे
भय पावुलात साचे  
हरवताच माऊली
जग होय श्वापदाचे

असे का छापील भाव
शरण तुज येण्यासाठी   
मोजुनी वह्या लिहले
असावे का पुण्य गाठी   

येवूनी नभांगणी या  
हो शलाका प्रकाशाची
आर्त क्षीण हाक ऐक
विझणाऱ्या अंतराची

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/









भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...