शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

उचला झाडू साफ करा






उचला झाडू साफ करा
दान सक्ती श्रम करा
झाडूवाला जातो पळून
वरवरचा पाला लोटून  
त्याला काम सांगू नका
युनिअनला चिथवू नका
फोटो काढा रिपोर्ट करा
उशीर झाला गर्दीत मरा
पण तोंड उघडू नका
कन्शेषण मागू नका
काम करून थकून गेला
ओझे वाहून पकून गेला
कुणा काही सांगू नका
साहेब देवा दुखवू नका
असा तर तू गुलाम आहे
नाकी पगार लगाम आहे
पिळणाऱ्याला पिळून दे
पळणाऱ्याला पळून दे
अधिक जु तू स्वहस्ते
मानेवरती बांधून घे


विक्रांत प्रभाकर

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

पाय उचलत नव्हता माझा






पाय उचलत नव्हता माझा
तिला सोयर सुतक नव्हते
उठता उठता पुन्हा बसलो
खरच तिला कळत नव्हते ?

मी कुणाशी बोलत होतो
नीट मला उमजत नव्हते
जडावला का जीव तिच्यावर
कोड सुटता सुटत नव्हते

माझे जगणे द्विधा वाहणे
पाणी संथही होत नव्हते
तिच्या डोळ्यातील दर्यामध्ये
माझे मजला सापडत नव्हते

कसे समजावू आता तिला
शब्दही मज मिळत नव्हते
कवितेचे एकही पान अन
मनातून उघडत नव्हते

किती बोललो कुणास ठावूक
बहुदा तिलाही वळत नव्हते
मजशी बोलता ना नक्की
प्रश्न कानावर पडत होते

विक्रांत प्रभाकर

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

घर वाळूचे






घर वाळूचे टिकते तोवर
ओल असते आत जोवर
घट्ट बसती शंख शिंपले 
उंच उभारल्या भिंतीवर

उन कधी मग येतो वारा
कोसळतो तो खुळा मनोरा
ढीग तोही नंतर नुरतो  
दूर दूरवर रिता किनारा

स्वप्न कालची गेली सरली
वाळूवरती रेष न उरली
उरे प्रतिमा कुणी खेचली  
हृदया मध्ये जपून ठेवली

असेच असते वेड्या जीवन
काय फायदा उगा रडूनी
पहा हवे तर चित्र कधी
धूसर धुकट आत शोधूनी

विक्रांत प्रभाकर





मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

कबीर ३:रहना नहीं देस बिराना



विराणदेशी ना राहणे रे ||
हा संसार पुडी कागदी
पाण्यामध्ये विरघणे रे ||
हा संसार काट्यांची झाडी
रडून हरवून मरणे रे ||
हा संसार झाडे झुडपे
जळूनी आगीत जाणे रे ||
म्हणे कबीर साधू बंधू रे
सद्गुरू नामे वसणे रे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कबीर २-- कौन ठगवा नगरिया लूटल हो





कुणी तरी ठग गाव लुटेल हो||
चंदन कोरून खाट बनवली
त्यावरी नवरी निजली हो ||  
उठ ग सखये सजवि मजला
प्रियकर माझा रुसेल हो||
येत यमराज पलंगी बसले
झरे डोळ्यातून अश्रू हो ||
चार जीवलग खाट उचलती
उठे चौ दिशातून धू धू हो
म्हणे कबीर ऐक साधु बंधू  
नाते जगताचे तुटेल हो ||

अनुवाद
विक्रांत प्रभाकर

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...