सोमवार, १४ एप्रिल, २०१४

तो परत नाही आला तर ..






तो कामावर जातो
तेव्हा तिला वाटते
किती बरे होईल
तो परत नाही आला तर
आणि ते एकच
दिवा स्वप्न पाहत
ती जगते दिवसभर
नऊ ते सहा
वेळ जातो भरभर
सहा वाजतात
दारावर बेल वाजते
तिचे स्वप्न खळकन फुटते
आणि मग ते दुस्वासाचे
तुच्छ कटाक्षाचे
वाकड्या शब्दांचे
तिरसट आवाजाचे
सहजीवन सुरु होते
रात्री निजे पर्यंत
कदाचित स्वप्नांतही ..
.......
कधी कधी तिला वाटते
ती वेडी तर नाही झाली
भिंतीवर डोके आपटत 
जगणाऱ्या कैद्यागत
भरसमुद्रात भरकटलेल्या
एकट्या खलाश्यागत
अन हे जगणे म्हणजे
होणारा भास असावा
त्या भयाण एकांतात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, १२ एप्रिल, २०१४

तुम्ही असता एक कळ



रानाला जाग येवू लागते तेव्हा  
रानातील मस्तवाल बलवान
सत्ताधारी आपापली ठेवणीतील  
नखे परजावू लागतात
शिंगांनी माती उकरून  
मोठ्याने डूरकू लागतात
ते आपापल्या गल्ल्या चौक रस्ते
यांच्या अदृष्य सीमां आखायला
त्यांचे रक्षण करायला सिद्ध होतात
सरसावतात शिक्कामोर्तब करायया
त्यावरती मुतून ...पुन:पुन्हा
जमेल तेव्हा जमेल तशी ही उठाठेव
तर करावीच लागते त्यांना ,
पण रान उठताच आणि
विणीचा हंगाम येताच
सारी ताकद पणाला लावून
सारा कळप गोळा करून
आक्रमक पवित्र्यात
ते भुंकू लागतात
गस्त घालू लागतात
डोळ्यात तेल टाकून  .
सारे डावपेच सुष्ट दुष्ट
माहित असतात त्यांना
सत्ते साठी कुठल्याही थराला
जाणे मान्य असते त्यांना
आणि तुम्ही जर त्यांच्या
त्या सीमेत येत असाल
तर चार पाच शिंतोडे    
तुमच्याही अंगावर उडतील  
तेव्हा ओके आँलराईट म्हणून
गुपचूप राहा बसून
वा दाखवा धन्यता डोळ्यात आणून
तसे नाही केले तर
त्यांचे तीर्थ घेतलेले
आणि उष्टे खाल्लेले
येतील तुमच्या अंगावर धावून
टाकतील तुम्हाला फाडून
तुमची लत्करे काढून  
इमान दाखवायला यापेक्षा
चांगली संधी कुठली बर ?
ते लढतील ते मरतील
ते जिंकतील कश्यानेही
ते मिरवतील ते फुत्कारतील
डल्ला मारतील साऱ्यावर
तुम्ही फक्त दूर राहायचं
मम अथवा बरं म्हणायचं
इथं तुमच्या गुपचूप बंडाला
काहीही मोल नसतं
कारण
तुम्ही असता एक कळ प ण
ते असती कळपचे कळप

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/











रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...