मंगळवार, १६ जुलै, २०१३

पडू दे पाऊस






पडू दे पाऊस सतत |
भिजू दे माती सतत |
हे जगन्नायक भगवंत |
कृपाकारी||१||
श्रमिक आणि शेतकरी |
पशुपक्षी वनचारी |
दयाघना तृप्त करी |
हेच मागण||२||
तुझे आहेत सारे |
प्रभू तूच आहे सारे |
तूच तुला वदतो रे |
होवून प्रार्थना ||३||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, १५ जुलै, २०१३

खपली






जखम आता सुकून गेली आहे
तरीपण खपलीखाली ओल आहे  
आता त्यात संसर्ग होणार आही
वेदनांची ठसठस त्रास देणार नाही
पण खपलीचा आहे ती.....
सांभाळावी तर लागणारच आहे
कदाचित जखमे पेक्षा अधिकच  
कारण जखमेच होण न होण
आपल्या हाती कधीच नसत
पण खपली उचकली तर
आपणच जबाबदार असतो फक्त

विक्रांत प्रभाकर               
http://kavitesathikavita.blogspot.in/

दिंडी मधले






दिंडी मधले | दु:ख सावळे |
पुन्हा दाटले | शब्दामध्ये ||१||
पुन्हा मनाचा | बांध फुटला |
उर भरला | तव प्रेमे ||२||
पुन्हा जीवाला | भूल पडली |
चालू लागली | वाट जुनी ||३||
स्वप्न साजिरे | एक निळूले |
मनी जागले | आज पुन्हा ||४||
विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १४ जुलै, २०१३

भावानुवाद ...अपने होंठों पर (क़तील शिफ़ाई) चा






भावानुवाद 
क़तील शिफ़ाई  यांच्या 
अपने होंठों पर सजाना चाहता हूँ  चा

ओठावर तुझे नाव सजवून मी
प्रेमगीत तुज बनवून गाईन सखे मी

विरहात तुझ्या अश्रू लाख ढाळीन
मोती होता तयांचे तुज वाहीन सखे मी

स्मरता तुजला गेलो जरी थकून
रोज आता स्मरणात तव येईन सखे मी

सारीच वस्ती घे अंधार वेटाळून
प्रकाशाया ,घर माझे जाळीन सखे मी

श्वास जावा तुझ्या मिठीत हा तुटून
अंत असा काव्यमय पाहीन सखे मी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...