गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

आत्मप्रभा







तव कृपेचा झरा आत                
हळू हळू आहे वाहत   
अन पावुले नकळत                   
तुजकडे आहे चालत    ll ll             
संपले आता रागावणे                
संपले उगा खंतावणे                  
तुच काढिले गळ्यातून                
मुढ अहंतेचे लोढणे   ll ll           
पाहतो होऊन चकित                
मीच होते काय हे केले  ?              
लोढणे मानुनिया प्रिय                
कैसे चैतन्य नाकारीले ? llll                
अवघी काजळी भ्रमाची
पूर्णपणे आता मिटली   
जाणीवेत आणि कोवळी
आत्मप्रभा आहे दाटली llll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २ जानेवारी, २०१३

लिहण्या सारखे काही नाही





लिहण्या सारखे काही नाही
तरीही लिहितो आहे
गाण्या सारखे काही नाही
तरीही गातो आहे
तरु वेली पाने फुले
उगाच पाहतो आहे
पर्वत आकाश तारे
सारे मीच होत आहे
झरा वारा प्रकाश
यात मीच वाहत आहे
कुणा काही देणे नाही
पुन्हा काही घेणे नाही
देणे घेणे तरीही
नि:संकोच होत आहे

विक्रांत तिकोणे http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, १ जानेवारी, २०१३

कीटक सूत्र







देह कीटक जन्म कीटक

कीटकांची या कटकट सतत १

भोग कीटकी रोग कीटकी

कीटकीचे स्वप्न कीटकी मनात २

कीटकी घरात जन्मती कीटक

निघाले कीटक तीच वाट ३

जरा कीटकी मृत्यू कीटकी

संपला कीटक कुठे अज्ञात ४



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/
वि .वा. शिरवाडकरांच्या नटसम्राट मधील स्वगतावरून

क्रश कोर्स: बाबाजी बनायचा







देव देव करता जावे

आपण हळूच देव होऊन

मग घुमावे जगा म्हणावे

याहो अवघे भक्त होऊन

तुम्हा उद्धारीन धनिक करीन

पापे पचवीन आणि तारिण

काय हवे ते तुम्हा देईन  

पहा सर्वत: काळजी घेईन

थोडी फार दाढी वाढवावी

थोडी समोर आग जाळावी

कपडे भगवी कुत्री पाळावी

ताठ बसायची कळ सोसावी ३

येणाऱ्याला म्हणावे तू आला?

छे, तुला तर मीच आणला

जाणाऱ्याला म्हणावे तू जातो ?

अरे, तुला मी हाकलून देतो

मर्जी धानिकावरी दाखवावी

भुरळ गोड शब्दाची पाडावी

गरीबा दाखवा सहानुभूती

पसरवतील ते तुमची कीर्ती ५

बोलावे वेद असे म्हणाले ,

गीतेत तमके चुकीचे दिले

खरतर ते मीच लिहिले

काळ प्रवाही थोडे बदलले

विभूती लावा दोरा बांधावा

गुणकारी तो किती सांगावा

विरक्तीचा आव आणावा

पण दानाचा पेटारा ठेवावा ७

नेहमीच मोघम बोलावे

द्वीअर्थी अन उत्तर द्यावे

बिंग फुटले तरी न डरावे

पाहिली परीक्षा म्हणावे ८

जो जे देईल तो ते घ्यावे

कधी प्रयोग जादूचे करावे

शिष्य नाटकी जर मिळाले

तर मग सोन्याहून पिवळे ९

भूत काढावे मंत्र म्हणावे

कुणास किचकट व्रत द्यावे

जर झाले तर मीच केले

न होईल तर तुमचे चुकले  १०

जर अपघाती कुणी वाचला

तर म्हणावे मी वाचवला

पण जर का कुणी मेला

तर मग प्रश्नच सुटला ११

असे निगरगट्ट व्हावे

झुकती दुनिया झुकावावे

आइते मस्त बसून खावे

इहलोकीच मुक्त व्हावे १२



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/










झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...