शांताराम महाजन सिनीअर फार्मासिस्ट
निवृत्ती दिना निमित्त .
************
मुंबई महानगरपालिकेत काही भाग्यवान विभाग आणि कर्मचारी आहेत
त्यातीलच एक विभाग म्हणजे
फार्मसी डिपार्टमेंट आणि
ते कर्मचारी म्हणजे औषध निर्माता .
रुग्णालय आणि दवाखाने
फक्त डॉक्टर वर चालत नाहीत
त्याला लागतात औषधे अन् इतर पुरक साधने
आणि ती हवी तेवढी हवी तेव्हा हवी तशी पुरवणे
हे फार अवघड काम
पण हा विभाग ते फार प्रामाणिकपणे करत आहे
या परंपरेतील एक तसाच प्रामाणिक
कष्टाळू दूरदर्शी काटेकोर पाईक
म्हणजेच शांताराम महाजन
शिवाजी महाराजांचे सारेच सेनापती धुरंधर होते
त्याप्रमाणे रुग्णालयातील
सारे सिनिअर फार्मासिस्ट
हे अतिशय कार्य कुशल होते
महाजन एक व्यक्ती म्हणून ही
मला तेवढेच भावतात ,आवडतात.
ते अतिशय नम्र सात्विक शांत आहेत
जणू शांताराम हे नाव सार्थ करतात
त्यांचे वागणे बोलणे वावरणे म्हणजे
एखाद्या नंदादीपासारखे असते
समोरच्याला न दुखावणे
जेवढी होईल तेवढी मदत करणे
एवढेच नव्हे तर कधी कधी
समोरच्याचे ओझेही खांद्यावर वाहणे
ते सहज करतात .
पण ती वेळ परिस्थिती गरज
ती तातडी निभावून नेतात
औषधाचा निर्विघ्न पुरेसा आणि
सततचा प्रवाह चालू ठेवतात
महाजन आणि त्यांचे सहकारी यांचे
हे फार मोठी योगदान आहे
व्हायचा, त्यांनाही त्रास व्हायचा
कधी कामाचा भार पडायचा
कधी एकटेपणी गाडा रेटावा लागायचा
त्यातच कधी औषध साठा उथीरा यायचा
तर कधी अवेळीच यायचा
त्यावेळी आलेल्या माल उतरवून घेणे
व्यवस्थित ठेवणे पुन्हा रचने
यात त्यांना ड्युटी अतिरिक्त
कित्येक तास द्यावे लागायचे
पण कर्तव्याचा हा भाग त्यांनी
सहज स्वीकारला होता
दुसऱ्या दिवशी फक्त
साहेब संध्याकाळचे सहा सात वाजले
आणि घरी जायला दहा वाजले
एवढे बोलली की विषय संपला
त्या बदल्यात काहीही मागणी नसायची
काही Favour किंवा मोबदल्याची अपेक्षा नसायची
त्यांना फक्त सोबतीला
प्रामाणिक कष्टाळू कामगार लागायचे
त्यासाठी त्यांचा हट्ट असायचा
ती पूर्तता झाली की मग ते खुश असायचे
शाळेतील फर्मासी डिपार्टमेंट चालवणे
( सोबत ऑफिसही )
एक भयंकर दिव्य होते
तेथे माल ठेवणे रचने वितरण करणे
मोठी परिक्षाच होती
त्यांनी ज्या पद्धतीने केले त्यासाठी त्यांना सलाम
कितीही चांगले अन मोठे काम असले
तरी ते काम एक मोठी जबाबदारी असते
जबाबदारी सोबत थोडी
काळजी टेन्शन वैताग हा येतोच येतो
आणि निवृत्तीचे वेध लागताच
मन अधिकच काळजीपूर्वक वागू लागते
त्या दिवसाची वाट पाहू लागते
मी निवृत्त झालो तेव्हाच महाजनांचा लागलेले
हे वेध मला जाणवत होते
साहेब आता माझे फक्त दीड वर्ष राहीले
ते म्हणायचे .
आणि आता तो महिना उजाडला आहे
फक्त दहा दिवस उरले आहेत
शर्यत संपली आहे फक्त
शर्यतीतील शेवटच्या दोरीला
हात लावायचे राहिले आहे
नंतर ते काम करतील न करतील माहित नाही
पण ते कुठलेही टेन्शन नसलेले
शांत निरामय आरोग्य संपन्न जीवन
त्यांना मिळावे हीच माझी परमेश्वरा जवळ प्रार्थना
धन्यवाद
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .