गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

सांग देवा कधी




सांग देवा कधी l पिकेल हे फळ l
गळून पडेल l मातीवरी ll १ ll
सांग देवा कधी l उजाडेल दिन l
हरेल अज्ञान l तमोमय ll २ ll
सांग देवा कधी l तुझा मी होईल l
जळून जाईल l देहभाव  ll ३ ll
संग देवा कधी l बेचैनी सरेन l
शांतीने भरून l जाईल मी ll ४ ll

विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाप

शाप ***** निसर्गाची बरबादी  करणाऱ्या  करंट्यांच्या  त्यावर पैसा  कमावणाऱ्या  नालायकांच्या  पिढ्यानपिढ्या  जातात  नरकात एक एक झाड...