जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, २९ एप्रिल, २०१३
गुरुवार, २५ एप्रिल, २०१३
डॉक्टरी नोकरी
शेकडो रुग्ण
तपासतांना
रोगांच्या
साथीत
वेढलेले
असतांना
नातेवाईकांच्या
झुंडी
अंगावर
झेलतांना
गुंड पुंडांना
तोंड देतांना
एकच असते भिस्त
एकच असतो आधार
एक तारखेपर्यंत
बेंकेत पडेल
पगार .
तसे काम छान
आहे
मित्र मंडळीत मान
आहे
घातल्यावर अॅप्रन
वाटे
देवाचेच वरदान
आहे .
पण जेव्हा पडते
कानावर
न केलेल्या
चुकीमुळे
मृत्यूच्या
खेळामुळे
सस्पेन्शन आले
मित्रावर
काळे फासले
गेले तोंडावर
अॅप्रनमधील हवा
निघून जाते
तोफेच्या तोंडी
आहोत
असेच अन वाटू
लागते
घरी जाणारा
प्रत्येक पेशंट
घरी गेल्यावर
..
मरेन असे वाटू
लागते
आपल्या ड्युटीत
जर
काही असेच झाले
तर
या वयात काय
करायचे
चाळीस पन्नाशीत
तोड कुठे वेंगाडायचे
घराचे कर्ज कसे
फेडायचे
मुलांचे शिक्षण
कसे करायचे
हळू हळू येणारा
प्रत्येक
पेशंट शत्रू
वाटू लागतो
भरलेल्या
कॅजुल्टीचा
वीट येवू लागतो
वाटते हॉस्पीटल
सोडून
दूरवर पळून जावे
याला त्याला
पैसे देवून
वा कुणा वशिला
लावून
दवाखान्यात
बसावे
सर्दी
खोकल्याचे “चांगले”
पेशंट रोज
पाहावे
पण ओळख लागत
नाही
देणे घेणे जमत
नाही
म्हणून त्याच
चक्रात
राहतो गरगर
फिरत
लोक जरी म्हणती
चांगला डॉक्टर
आहे
आमचा जीव वाचवतो
त्यांना काय
माहित
रोज तो मरत
असतो
विक्रांत
प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, २० एप्रिल, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
द्वैत
द्वैत ***** चंद्र चांदणे तुझेच होते सुरेल गाणे तुझेच होते मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...

-
मोकळे केस तू ! रुपेरी कांतीचे लेवून चांदणे मोकळे केस तू मिरवित येते काजळ कोरले दिठीत सजले गाली ओघळून तीट लावते चालणे त...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
द्वैत ***** चंद्र चांदणे तुझेच होते सुरेल गाणे तुझेच होते मंत्रमुग्ध मी नयनी तुझ्या असणे सारे तुझेच होते ॥ वारा किंचित असल्...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
भेटीचा सोहळा भेटीचा सोहळा जाहला आगळा चंद्र वितळला डोळीयात ॥ बाहुत भिजला शरद कोवळा दवात न्हाईला सोन सुर्य ॥ जिव...
-
नोकरीचा प्रवास ************ हा प्रवास सुंदर होता या महानगरपालिकेतील नोकरीचा हा प्रवास सुंदर होता आणि या सुंदर प्रवासाचा हा श...
-
रंग ***" उधळलेस रंग किती रंगीत झाले जीवन सरुनही सण सारे उतरती न अजून ॥ रंग तुझ्या डोळ्याचे रंग तुझ्या स्पर्शाने रंग तु...
-
डॉ उषा म्होप्रेकर मॅडम माझी प्रिय बॉस (श्रद्धांजली ) ************************ चंद्राची शीतलता आणि सूर्याची तप्तता धारण केलेले...
-
दुपार ***** वारा सळसळ करतो हलके क्षणात दृश्य करतो बोलके फांदी वरचे फुल सावरते पराग आपले उधळून देते पाना मधला पक्षी पिव...
-
काजळल्या पथी डोळ्यांना दिसेना शेवटचे पावूल कुठले कळेना तसे तर आधार लाख सोबतीला कुणी न आपला कळे या जीवाला ...