गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

प्रियतम





कुठे आहेस तू
कसा आहेस तू
कधी येणार तू
प्रियतम ||
तुज वाचून हा
जीव न रमतो
रे तळमळतो
रात्रंदिनी ||
या उदास रात्री
हा विरह गात्री
का डोळे भरती
वेळोवेळी ||
तुझ्या विषयीचे
गूढ आकर्षण
मनात दाटून
पिसाट मी ||
तुजला शोधून
प्राशून घेवून
माझे मी पण  
तूच व्हावे ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

विषकन्या






म्हणाले उगा पंगा घेवू नको मजशी

नाकासमोर नीट चाल  वाट हीच बावनकशी

पण मस्ती होती कुणास ठावूक कसली

जाणून बुजून मी आडवाटेस उडी घेतली 

म्हाताऱ्या बॉस सारखे चरफडले जीवन

पावलोपावली दु;खाचे भेटू लागले आंगण

एकदा आडव्यात शिरल्यावर माघार कसली

म्हटलो साल्याची मस्ती पाहिजे जिरवली

प्रत्येक दु;ख मग कोळून पिवू लागले

तन मन जन्म सारा वेदनेचा डोह झाले 

हळू हळू सोसतांना साहणेच धर्म झाला

क्षणोक्षणी विष देही पिंड विषकन्या झाला



 विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २३ ऑगस्ट, २०१५

विवस्त्र याचना ..






 धावणाऱ्या मना
पोसत्या वासना
तुझ्या पायावरी
आता दयाघना

विझत्या श्वासांना
कळतात खुणा
येवून सांभाळ
आता दयाघना

असे जगतांना   
व्यर्थ तुझ्याविना
दाटे रितेपणा 
आता दयाघना

सुख शोधतांना
कैफी धावतांना
उजाड कामना
आता दयाघना

तुटल्या शब्दांना
विझल्या स्वप्नांना  
घेशील ना हाती
आता दयाघना

तुज मागतांना
लाज वाटते ना
विवस्त्र याचना
आता दयाघना

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...