शुक्रवार, २७ मार्च, २०१५

घेतो ओठी लिहूनी ओळी





 सरतो काळ
हळूहळू अन
परतून मागे
क्षण येईना

तनमन सारे
व्यापून वेदना
जरी तळमळे
जन्म कळेना

झगमग दुनिया
दिसे भोवती
खरी की खोटी
मज आकळेना

मेणाच्या या
दोन हातांना
सुख धगीचे
अन पेलवेना

असो जगाचे
व्यर्थ सांगणे
शब्दात या  
नसे सांत्वना

घेतो ओठी
लिहूनी ओळी
कधीतरी बघ
भेटेन सुरांना

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २४ मार्च, २०१५

संत विक्रांत






संत विक्रांत जेव्हा घरी जातो
एक नाठाळ नवरा होतो
मौनाचा लगाम सुटतो  
पोरकटपणा वाहू लागतो
दुधावरची साय खाता
कोलेस्टेरॉल विसरून जातो
चहावर चहा पिता
बायकोची बोलणी जिरवतो
शांत नम्रपण वगैरे  
चपले जवळ काढून ठेवतो
एक वेडा आळशी नवरोबा
तिच्या नाकात दम आणतो
कटकट चिडचिड आणि त्रागा
घरभर पसरून ठेवतो
आणि तिचा बांध सुटता
ओठावर बोट ठेवतो
गुपचूप ताट वाढले
छान म्हणत मस्का मारतो
सुटलेला संत मुखवटा
चपले जवळ शोधू लागतो
तिला माहित असतो तो
तरीही पुन्हा ओढून घेतो
उद्या संध्याकाळ पर्यंत ..
नंतर पुन्हा जो गळणार असतो .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, २३ मार्च, २०१५

देहाचे कौतुक





काय या देहाचे
करावे कौतुक  
दावियले सुख
जगतांना ||
कधी भाकरीचे
कधी साखरेचे 
चोचले जिभेचे
पुरविले ||
आणि दिली साथ
सदा संकटात
उभे आजारात
राहियले||
तयावीण कैसे
दिसते हे जग
जीवा रस रंग
कळते ना ||
त्याची माझी जोडी 
जुगाड देवाचा
कळेना तयाचा
काय हेत ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...