आत्मभान
********
आत्मभान यावे ।हृदयी ठरावे ।
चित्तात वसावे ।अनुभवे।।
हीच तळमळ ।लागली जीवाला ।
म्हणुनी धावला ।जीवराव।।
परी ठायी ठायी।लागली वळणे
सुखाचे छळणे।लाघवी ते।।
जीवन हा योग।कळल्यावाचूनी।
गुह्य उघडुनी।कोण दावी।।
*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
आत्मभान
********
आत्मभान यावे ।हृदयी ठरावे ।
चित्तात वसावे ।अनुभवे।।
हीच तळमळ ।लागली जीवाला ।
म्हणुनी धावला ।जीवराव।।
परी ठायी ठायी।लागली वळणे
सुखाचे छळणे।लाघवी ते।।
जीवन हा योग।कळल्यावाचूनी।
गुह्य उघडुनी।कोण दावी।।
*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट जल गेले हरपून नील रत्न सागरात परी राहिला ओंड...