रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

मारुनी स्व:तला...







पूजावे दत्ताला 
स्मरावे दत्ताला

भजावे दत्ताला 
भक्तीभावे ||

त्यजावे जगाला 
विषयी मनाला

धरावे बापाला 
गिरनारी ||

सांगावे प्रभूला 
रक्षावे मजला

आपदी सकला 
पडताची ||

हरावे क्लेशाला 
दु;खाच्या मुळाला

लागूनी मार्गाला 
लगबगे ||

मारावे स्व:तला 
वाहुनी तयाला  

उरावे पदाला 
सुखरूपी  ||



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

देवाच्या कारणे






घडो हे जगणे
देवाच्या कारणे
बाकी देणे घेणे
उरो नये ||
देहाची वासना
ठेवली बांधून
संपले म्हणून
काम तिचे ||
मनाची या हाव
मनालाच ठाव
कळला उपाव
त्याचा आता ||
वाहियले फुल
जैसे प्रवाहात
देवाच्या दारात
तैसे मी पण ||
आता  तरंगणे
अथवा बुडणे
जगणे मरणे
सोपस्कार ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

   

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

तिच्यासाठी






निळे डोळे
नभ उधळत
केस मोकळे
हवेत लहरत

ती ये अलगद
पुनव चंद्रागत
लख्ख प्रभा
मनात सांडत

ऋतू ऋतूतून
रंग बदलत
गूढ स्वप्नांचे
पंख पसरत

थांब म्हणूनी
नच थांबते
येण्याची वा
वाट पाहते

किती जन्म
उगा भटकत
कर्म बंधने
ओढून घेत

तिच्यासाठी
पुन्हा आलो
भरून पावलो
तृषार्थ राहिलो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

जीवन हे ओवी एक व्हावे






ज्ञानेशाची भिंत ठावूक न मला
योगाग्नी पेटला मांडयासाठी ||
ज्ञानेशाचा रेडा सांगू नका मला
मेलेला उठला सच्चिदानंद ||
गीतेची टीका ग्रंथ तोची निका
भावार्थ दीपिका चमत्कार ||
एका ओवीसाठी एक जन्म घ्यावा
पुनःपुन्हा व्हावा संग ऐसा
अधिक मागणे नच अन्य काही
ज्ञानदेवा पायी लीन व्हावे ||
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...