जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५
रविवार, २ ऑगस्ट, २०१५
मैत्री आणि प्रेम (मैत्रीदिना निमित्त)
प्रेमाच्या खळखळाच्या आत
खोलवर संथपणे वाहणारी मैत्री
हीच प्रवाहाची आधार असते
आणि त्या प्रेमाचाही
मैत्री नसलेले प्रेम असते
एक उपचार देह गरजांचा
ओढून ताणून बांधलेली मोट
आजच्या उद्याच्या व्यवहाराची
फार भाग्यवान असतात ते
ज्यांना प्रेमाआधी मित्र भेटतात
किंवा प्रेमामध्ये मित्र गवसतात
तशी तर मैत्रीची शक्यता
प्रत्येक नात्यात असते
प्रत्येक ओळखीत असते
प्रत्येक कोंदणात मैत्री
एक बहारदार रत्न असते
म्हणूनच ज्याला असतात
अनेक जवळचे जीवाभावाचे मित्र
कुठल्याही आर्थिक सामाजिक राजकीय
किंवा वैयक्तित लाभाच्या अपेक्षेविना
केवळ निखळ मैत्रीसाठी जवळ आलेले
ते जगातील सर्वात श्रीमंत लोक असतात
विक्रांत प्रभाकर
शनिवार, १ ऑगस्ट, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
अटळ
अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची ती कृती भ्याड नामर्द रात्रीची अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची ती कृती उद्दाम द्वाड दिवसा...

-
अलिबाबाची गुहा ************* ती गुहा अलिबाबाची दिसते कधी पुन्हा शब्द परवलीचे पण नच बोलतो मी पुन्हा तेव्हाही ती परवल चुकलीच होत...
-
रिक्तहस्त ******** रिक्तहस्त जीवनाची खंत ही मिटत नाही अंतर्बाह्य कोंडणारा एकांत सरत नाही दिलेस तर मिळेल सुखाची ही धूर्त अट ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
पाय माघारी वळता *************** पाय माघारी वळता जीव खंतावला माझा का रे विठ्ठला रुसला मज दिलीस तू सजा जीवा उदार होऊन वाटे चा...
-
माई **** माझ्या व्याकूळ प्राणात फक्त तुझे गीत आहे बोलाव ग आता तरी प्रेम तुझी रीत आहे आलो होतो एकदा मी धाडलेस तू माघारी ती ...
-
मनातील प्रश्न सारे मनामध्येच राहू दे चुकलेल्या उत्तराने वर्ष व्यर्थ जातात रे तुटलेत धागे जरी का...
-
नावापुरता ******* काही मोहर लगेच गळतात हिव येताच देठ तुटतात म्हणून वृक्ष का रडत बसतो माझे म्हणत आक्रोश करतो समोर येई ते हरव...
-
दरवर्षी ॥विसर्जनी फटाके फुटती नगारे वाजती पैसे ते जळती जनतेचे ॥ कोणी काय केले कुठून ते आले प्रश्न हे असले पडू नये ॥ आहा...
-
स्फुरण ***** माझिया स्फुरणी विश्वाची आटणी करून गुरूंनी दावियले ॥ विश्वाचा आकार दिसता दिसेना मनास कळेना कोण मी रे॥ आता कुठ...
-
अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची ती कृती भ्याड नामर्द रात्रीची अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची ती कृती उद्दाम द्वाड दिवसा...