बुधवार, २२ एप्रिल, २०१५

Eshan translated one of my poem













Eshan my son who is in 7 std translated one of my poem in English .




There is nothing to write
But still I am writing
There are no songs in my mind
But still I am singing
Trees leave flowers and birds
With no reason I am observing
River mountain sky and stars
I am experiencing …
That I am one of them

Poet Dr.Vikrant Tikone
Translated by Eshan Tikone

सोमवार, २० एप्रिल, २०१५

फुलबाग जळल्यावर...





फुलबाग जळल्यावर ठरवले
आता या वाटेला पुन्हा जायचे नाही
ज्वारी बाजरी मका कापूस
दुसरे पिक घ्यायचे नाही
फार काही नाही मिळाले तरी
उपासमार तर होणार नाही
पोट भरेल घर चालेल जरी
माडी घरावर चढणार नाही

पण जाता जाता रस्त्याने  
दिसतात कधी कुणाचे बगीचे
आकाश झगझगीत रंगाचे
श्वास होतात धुंद फुलांचे
डळमळतो निश्चय अन
पाय जणू होतात ओंडक्याचे
  
मग त्या दिवशी
बाजरीच्या बाजारात फिरता फिरता
मी विचारू लागतो
फुलांचे बियाणे ऋतुचा कल
अन बाजाराचं मागणे
तेव्हाच डोळ्यासमोर येतात
थकलेले आईबाप
काटकसरी बायको
शाळेत जाणारी पोरं
गोठ्यातील जनावरं  
अन मी पुन्हा घरी येतो तेव्हा
आणलेले असतात तेच
बाजरीचे करडईचे अन तिळाचे बियाणे
घट्ट मनाने

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १९ एप्रिल, २०१५

माझा देव खरा फक्त !!






कृष्ण हवाय आम्हाला
बुद्ध हवाय आम्हाला
येशू हवाय आम्हाला
पायी डोकं ठेवायला

भट हवाय आम्हाला
भन्ते हवाय आम्हाला
पाद्री पूजा करायला
मध्यस्थ भला चांगला

तीच माती पुण्यवान
तोच धातू मुल्यवान
तोच अलभ्य पाषाण
आणि पाचदा अजाण

आणि साठला मनात
तोच एक घट्ट हट्ट
माझ्या सवे देव फक्त
इतरांचे व्यर्थ कष्ट

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/










झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...