गुरुवार, १९ मार्च, २०१५

कळत नाही





आशेचा शेवटचा
चिवट थेंब
निग्रहाने मनातून
निपटून टाकला
आज सारे आकाश
का भरून आलेय  
कळत नाही |
कालच कुंडीतील 
कबुतराचे घर
काढून फेकले
अंडयासकट
गुलाब का कोमेजला
कळत नाही |
ती गेली सहजच
बोलून की
आपलं कधीच
जमणार नाही
या शहरात  
डोळ्यांची साथ
आलीय नक्कीच |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, १८ मार्च, २०१५

खडा टाकून बघावं म्हटलं







खडा टाकून बघावं म्हटलं
पाखरू भेटलं तर भेटलं
आणि गेलं तर जाऊ दे उडत
गेलं तर गेलं !
खरतर ते  
उडायचीच शक्यता
जास्त होती
अन घडलही तसच
पाखरू दूरवर निघून गेलं
डोळा मारून मी स्वत:ला
आगे बढो यार म्हटलो
हे तर नेहमीच आपलं
अन मोठ्यानं हसलो
पण कुणास ठावूक कसं
यावेळी काहीतरी
भलतंच असं होतं झालं  
फांदीवरून जे ते उडालं
थेट मनात जावून बसलं
आता मनात खडा
कसा मारायचा
हे कुणीच नव्हतं शिकवलं
अन तेव्हापासून दिवस रात्र
मनात तिच चिवचिव आहे
उजाड झाड उजाड फांदी
व्याकूळ हा जीव आहे  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/








सोमवार, १६ मार्च, २०१५

प्रकाश पाझर जन्म व्हावा






गढूळल्या देही
गढूळले मन
गढूळ जीवन
जात आहे ||

गढूळ मनाच्या
गढूळ आकांक्षा
गढूळल्या दिशा
झाल्या साऱ्या ||

मिळावा प्रसाद
तुझिया प्रेमाचा
अर्थ जीवनाचा
कळो यावा ||

सरो साचलेला     
अवघा अंधार
प्रकाश पाझर
जन्म व्हावा ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...