जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५
सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५
एका मैत्रिणीला ..
अग वेडे खरे प्रेम खरच
काही मागत नसते
देणे घेणे त्याच्या हिशोबात
मुळीसुद्धा नसते
प्रेमासाठी फक्त एकदाच
प्रेम करून बघ
लाख दु:ख येवू देत
पण जीव देवून बघ
प्रेम भेटते क्वचित कुणाला
सांगू काय मी अधिक तुला
कधी उशिरा कधी लवकर
काळ मोजत बसू नकोस
आजची संध्याकाळ ही
अन वाया घालवू नकोस
भेटेल जेव्हा तुझा सखा
निसटून त्या देऊ नकोस
असतील इथे काही लुटारू
म्हणुन मागे फिरू नकोस
लाव निकष कर परीक्षा
पण हातून घालवू नकोस
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
शनिवार, ३१ जानेवारी, २०१५
आता कैसे गाऊ
आता कैसे गाऊ
सांग तुझे गुण
चाकाटले मन
शब्दहीन ||१
बोलू जाय तरी
श्वास कोंदाटून
राही घोटाळून
अंतरीच ||२
लिहू जाय तरी
जातात वाहुनी
अक्षरे भिजुनी
आसवांनी ||३
बोललो तितुके
तुझेच कौतुक
दुबळा वाहक
वावटळी ||४
विक्रांत प्रभाकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
भय
भय *** किर्र निर्मनुष्य अश्या जयंती माता जंगलात मऊ मातीत उमटलेली ताजी व्याघ्र पावुले अन् एकटेपणी चाललेली माझी परिक्रमा . वि...
-
कवितेतील दत्त ** जर कधी तुम्हाला माझ्या कवितेत दत्त दिसत नसला तरीही दत्त तिथेच वसत असतो जरी मी वाचेने म्हणत नसलो तरीही त्यालाच...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
झाड **** या किनाऱ्याला मी चालत आहे मी माझ्यातच रुजत आहे मी झाड होत आहे इथले पाणी खोलवर माझ्या आत झिरपत आहे तोच मी जरी काह...
-
लोणचे व चटणी ************ तोही जाणतो की तो लोणचे आहे तीही जाणते की ती चटणी आहे चटणी आणि लोणचे चवीपुरते असते जेवणाची फक्त लज्...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
-
विझू देत +***+ माझ्या विझल्या आगीत का ग जिंदगी शोधते नको उकरूस धुनी तिथे ठिणगी नांदते ॥ गेला जळूनिया सारा जरी इथला पसारा उब ज...
-
देव देश अन धर्मासाठी ********** जन्म देवासाठी जावो हा सगळा भावभक्ती मळा फुलो सदा ॥ देह देशासाठी जावो हा सगळा ...
-
असे मरण यावे ************ मरणालाही हेवा वाटावा असे मरण यावे मजला जिवलग कुण्या मिठीमध्ये प्राण सुटावा देहा मधला ओठावरती स्मित असाव...


