जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
रविवार, ११ जानेवारी, २०१५
शनिवार, १० जानेवारी, २०१५
मौन द्वारावर
अंतरातून उमटणाऱ्या उर्मी
अनावर व्याकूळ उत्सुक
मौनाचा अर्थ जाणून घ्यायला
शब्दांनी बरेच काही सांगितले
मेटाकुटीस येत
अर्थाचा भार वाहत
शब्द देतात
हिंम्मत अन आधार
अन आणून सोडतात
अगम्य अनाकलनीय
अश्या प्रवेश द्वारावर
तिथून पुढे चालायचे
आपले आपणच
आधाराशिवाय
पण कुणाचा तरी आधार
सदैव घेत आले मन आजवर
ती सवय ती चाकोरी
अजून मनाला सोडवत नाही
शब्द सुटत नाही
ते आग्रह करते आहे साथीचा
आणि कदाचित म्हणूनच
पावूल पुढे पडतच नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५
पाघळणे माझे..
ढुंकूनही माझ्याकडे
राणी आता पाहू नको
उडालेत केस बहु
कलपाला हसू नको
थकलेत सांधे सारे
करकर वाजतात
भिंगाआड डोळे रूप
कसे बसे पाहतात
पाघळणे माझे असे
मनावर घेवू नको
पुरुषाची जात आहे
विचार तू करू नको
कधी कधी रूपामध्ये
मन असे अडकते
चाली मध्ये भान कधी
वेडे खुळे हरवते
असू देत मन जरी
तुजवरी भाळलेले
सुजाण तू व्यवहारी
तुज जग कळलेले
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
निरोप
निरोप ( विसर्जन) ***** आलास आता आताच अन् पुन्हा निघालास कसे दिवस उलटले कळले नाही कुणास ॥१ तुझे स्थान हृदयात जरी का नित्य अस...
-
डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात त्यांना सांगायची ...
-
संजय तिकोणे सर ( सेवापूर्ती दिना निमित्त ) *********************** तिकोणे सर म्हणजे माझा लहान भाऊ संजय ! संजयला आम्ही भावंडं स...
-
स्वीकार ******* करी रे स्वीकार माझा मायबापा आगा दयारूपा माझे म्हणा नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती परी उपरती खरी असे व्यर्थ म...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
दत्त दत्त दत्त मुग्ध झाले चित्त सदोदित गात तेच नाम ll १ ll आणि आठवत कृपाळू ते स्मित आनंदे व्यापत ...
-
निरोप ( विसर्जन) ***** आलास आता आताच अन् पुन्हा निघालास कसे दिवस उलटले कळले नाही कुणास ॥१ तुझे स्थान हृदयात जरी का नित्य अस...
-
वेदनांनी झोळी माझी सारी भरू दे रे अल्लाह मग हवे तर मज पूर्ण वेडा होवू दे रे अल्लाह चंद्र कधी तारे तुज मी सांग मागितले होते स्वच्छ हृद...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
वठताच वृक्ष ********** वठताच वृक्ष पक्षी उडून जातात घरटी खाली होतात आणि उरते ते फक्त वृक्षाचे एकटेपण त्यात पक्ष्यांची काह...
-
मिठीत जगणे होते मिठीत मरण आले हाती जपायचे होते हातीच सारे संपले मोडुनी घर पडले स्वप्न मातीत सं...


