बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

पोटी तुझ्या जन्मतांना







स्वप्ने सारी दुरावली
तू दुरावू नकोस ना
जगण्याचा आधार हा
तू हिरावू नकोस ना

हास्य तुझे पाहतो मी
फार काही मागतो ना
चांदण्यात नाहतो मी
चांद हाती ओढतो ना

सुख नको काही पण  
दूर लोटू नकोस ना
मिसळतो मातीत मी
पाय देवू नकोस ना

विझावेत श्वास माझे
तू समोर असतांना
नि समोरी दिसावीस
पोटी तुझ्या जन्मतांना

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/










सरडा (मणि मोहन मेहता यांच्या कवितेचा भावानुवाद)





सरडा (मणि मोहन मेहता यांच्या कवितेचा भावानुवाद)

हिरव्या झाडीत बैसला सरडा
हिरव्या रंगाचा होवून सरडा
जबड्याहूनी ती जबर घातकी
रंगांची त्याच्या जहरी चकाकी
हिरवा मारक लपता झाडीत
येता खालती भुरकट मातीत
खिसे भरुनी ढेकर देवूनी
येई घराला सरडा परतुनी
सायंकाळचे ते पाच वाजता
रंग तयाचा असेल कोणता
प्रियेशी प्रेमाचा रंग कुठला
अन कुठला चुंबिता बाळाला
कुठल्या रंगाचा लावून चेहरा
सरडा परतेन आपुल्या घराला
काय असेल ठावूक तयाला
का रंगात सरडा हरवलेला

अनुवादक
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

अर्धनटेश्वर





चिटकवली विजोड जोडपी
फेविकॉली व्यवहारावर
सात टाके खोटे नाटे
देव ब्राम्हण अग्नी समोर
विजोड देही विजोड देव
शाल पांघरून जीवनावर
संसाराचे तप आचरती  
दु:खाच्याच कैलासावर
रित्या काळजाचा तुकडा
सदा शोध घेतो अनावर
अपूर्णता जाणुनिया मनी
होय व्याकूळ अर्धनटेश्वर 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

शिवसैनिकाचे मन



झुकू नको वाकू नको
सत्ते साठी नमू नको
हक्काचे असेल त्याला
लाथ पण मारू नको

उतू नको मातु नको
वसा तुझा टाकू नको
सेवे साठी जन्म तुझा
लोभा मध्ये फसू नको

दोन चार गावा साठी
लाचारी ती नको नको
दे सोडून सारेच ते
धर्म पण सोडू नको

भिंती पडू देत साऱ्या  
पाया खचू देवू नको
येतील अशी वादळे
झुंज ती विसरू नको

विक्रांत तिकोने

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...