सोमवार, ८ सप्टेंबर, २०१४

अपेक्षांची प्रेत






अपेक्षांची प्रेत
तरंगू लागतात
निराशेच्या डोहात
निरर्थक
ओशाळलेले मन
शब्दावाचून   
घेते पुरून
स्वत:लाच
आणखी एक प्रहार
घेवून छातीवर
अस्तित्वाचा स्वर
कोमेजतो
हे ही जगणं
घ्यावे स्वीकारून
तुडवावे रान  
जिंदगीचे

विक्रांत प्रभाकर

रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

मी मेल्यावर




मी
मेल्यावर
तू काय करशील


मी मेल्यावर तू रडलीस तर
मला खरच आश्चर्य वाटेल
किंबहुना ते तुझे आजवरचे
सर्वात श्रेष्ठ नाटक ठरेल
नकळे कसे काय तू हे
मरण साजरे करणार
बोलावून मित्रांना मजेने
नच पार्टी देता येणार
रंगवून सजवून घराला
नच रोषणाई करता येणार
सार काही विकून किंवा
दूरवर निघून जाता येणार
कुंकू तर कधीच लावले नाहीस
बुरसटलेपणा वाटतो तो तुला
मंगळसूत्र शोभेचा केवळ दागिना
कधीकधी उगा होता तू घातला
सौभाग्य चिन्ह जोखड मानते
विधवा तर तू आताही दिसते
त्यामुळे ती तुझी एक चांगली
संधी फुका गेली असे वाटते
तू रड नको रडूस मेल्यावर
काय फरक पडणार मला
माझी मात्र सुटका होणार
एवढे नक्की कळतेय मला

विक्रांत प्रभाकर







शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

मुके प्रेम







सारे कळूनही
तू ते कळले
असे कधीच
दाखवणार नाही

माझे ओठही
तुझ्या प्रेमाचे
शब्द कधीच
बोलणार नाही

मग ही कहाणी
मुक्या प्रेमाची
का कधीच अर्थ
पावणार नाही

दुनियेची भिती
जन्माचा संस्कार
तोडणे तुला का
जमणार नाही

विक्रांत प्रभाकर











गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

ती -- रसमलाई !





मिठाईवाल्याच्या
काचेच्या कपाटातील
रसमलाई !
परवडत नसूनही
जिभल्या चाटत पहावी
तसा मी तिला पाही
खिशात पैसे नसायचे
वडापावालाही
पण ती दिसली
कि पोट भरायचे
डोळ्यानेही पोट भरण्याची
ती कला !
तेव्हा मला कळली
जगातला सर्वात श्रीमंत माणूस
झालो होतो मी ! 

विक्रांत प्रभाकर


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...