शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

मुके प्रेम







सारे कळूनही
तू ते कळले
असे कधीच
दाखवणार नाही

माझे ओठही
तुझ्या प्रेमाचे
शब्द कधीच
बोलणार नाही

मग ही कहाणी
मुक्या प्रेमाची
का कधीच अर्थ
पावणार नाही

दुनियेची भिती
जन्माचा संस्कार
तोडणे तुला का
जमणार नाही

विक्रांत प्रभाकर











गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

ती -- रसमलाई !





मिठाईवाल्याच्या
काचेच्या कपाटातील
रसमलाई !
परवडत नसूनही
जिभल्या चाटत पहावी
तसा मी तिला पाही
खिशात पैसे नसायचे
वडापावालाही
पण ती दिसली
कि पोट भरायचे
डोळ्यानेही पोट भरण्याची
ती कला !
तेव्हा मला कळली
जगातला सर्वात श्रीमंत माणूस
झालो होतो मी ! 

विक्रांत प्रभाकर


मंगळवार, २ सप्टेंबर, २०१४

कडवट क्षण







असे इतके कडवट 
असतात काही क्षण
कि उद्दिग्न विस्कळीत 
होते आपलेच मन

अरे कश्यासाठी अन
का हे अवघे म्हणून ?
पिंजारात भणाणत 
असतात व्यर्थ प्रश्न 

अश्यावेळी जाती सारे  
अर्थ भान हरवून
पायाखालती कळ्याही 
जातात मग चिरडून 

अस्तित्व भरुन अंती
उरे एक आक्रंदण
जाणवून जाते मन 
संवेदना बधिरून

आपलेच जीव प्राण
ओझे आपणा वाटून
घेतो वार धारधार 
स्वत:वरच करून

सगळाच अर्थ जातो
मग विच्छिन्न होवून
चालते जीणे ओढत 
मढे  मरणावाचून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



डॉ. मनीष दोशी Dy MS (I/C)राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)

डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात  त्यांना सांगायची ...