बुधवार, २७ ऑगस्ट, २०१४

दु;खाचे छप्पर



दु;खाचे छप्पर
जेव्हा अचानक
पडते कोसळून  

वेड लावणारा
पाऊसही जातो
नकोसा होवून

आपणच लावलेले
रंग चिखलागत
येतात ओघळून

भरपूर प्रकाशाची
आपली हाव हसते
मोठ्याने गडगडून

आपले टीचभर
सामान उरी येते
मणभर होवून

सुन्न हवालदील  
आपण जातो
पसारा होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०१४

तिची याद अन तनहाई






कुणात गुंतायचे नाही
कुणात हरवायचे नाही
ठरविले होते कि खरच
कुठेही अडकायचे नाही
अडकलो कि फास बसतो
असा कि, सुटता सुटत नाही
प्राण व्याकूळ होवून जातो
रात्रंदिन ,काही सुचत नाही
आपल्या मना किती मारायचं
अश्या जगण्यास अर्थ नाही
तिची याद अन तनहाई
अजून मिटता मिटत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

जुनी प्रार्थना







जुनी प्रार्थना
प्रभू आम्ही
करतो
पुन्हा पुन्हा |
जुनेच शब्द
जुनी करुणा
भाकतो
पुन्हा पुन्हा |
जुनीच परी
ती तू वंचना
करिसी
पुन्हा पुन्हा|
तसाच जड
जन्म घेवून
चालतो
पुन्हा पुन्हा |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...