जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शुक्रवार, १८ जुलै, २०१४
बुधवार, १६ जुलै, २०१४
पुन्हा रुजू येता प्रीत ...
मनातील प्रश्न सारे
मनामध्येच राहू दे
चुकलेल्या उत्तराने
वर्ष व्यर्थ जातात रे
तुटलेत धागे जरी
काही मनी जपावेत
पुन्हा रुजू येता प्रीत
नवे स्वप्न फुलावेत
जीवनाच्या वादळात
कधी कुणी हात देत
आतल्या जखमावर
हळूवार फुंकारत
संशयाची छाया मनी
पडूनिया देवू नको
हाती येता पुन्हा फुले
उधळून देवू नको
छोटेशीच जिंदगानी
भराभर वर्ष जाती
सुटल्याची खंत नको
सुटू देत खोटी नाती
अशी हास खळाळून
आनंदाने झळाळून
बाकी सोड सारे सारे
प्रीती कर उधाणून
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
मंगळवार, १५ जुलै, २०१४
सजवावे तुज ..
तुझे एकटेपण
तुझ्या ओठातून
उमटते काही
बहाणा घेवून
जरी दूरवर
सोडुनिया घर
मनाच्या अंगणी
स्मृतीचा सागर
मायावी जगात
मायावी शब्दात
हरवे स्वत:ला
उगाच कशात
तुझे थकलेले
व्याकूळ डोळे
मनात दाटले
आभाळ सावळे
मजला बेचैन
टाकती करून
वाटे सुखा मग
आणावे खेचून
हजार गाण्यांनी
हजार शब्दांनी
सजवावे तुज
हजारो स्मितांनी
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
प्रार्थना
प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन देखीले सगुण परब्रम्ह हास्य मुग्ध मुखी हात उंचावले आशिष भरले प्रेममय परमपवित्र ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन देखीले सगुण परब्रम्ह हास्य मुग्ध मुखी हात उंचावले आशिष भरले प्रेममय परमपवित्र ...
-
महात्मा ज्योतिबा फुले ****** ज्योतीबा, तू लावलेल्या वटवृक्षांच्या सावलीत जगत आहोत आम्ही समतेची स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत आम्ह...
-
चांदणे **** भिरभिरणारे खुळे हरिणीचे काळे डोळे डोकावता तयामध्ये मन झाले चिंब ओले ॥१ एक थवा पाखरांचा उंच मेघापार गेला अन शब्द हर...
-
तू गेलास न सांगता न बोलता अचानक नाव गाव सारे टाकून अज्ञात अशा भविष्याची चादर ओढून तसे तर तुलाही माहित...
-
दत्त फळीवर दत्त गाडीवर दत्त छातीवर सोनसळी ॥ दत्त देव्हार्यात दत्त देवळात दत्त कोनाड्यात देवळीच्या ॥ दत्त ओफिसा...
-
सुटता सुटता आयुष्याच्या या वळणावर हवे नकोपण झाले धूसर तरीही दाटता क्लेश भोवती पुन्हा वाटते जावे दूरवर जरी वाटतो सुटला सुटला दि...
-
बेल साबळे सिस्टर (श्रद्धांजली ) ********** साखर पेरल्या शब्दात . साबळे सिस्टर बोलायच्या कधी कधी वाटायचे उगाचच मस्का लावायच्या ...
-
व्याप्त दत्त *********" वाजते मनात झांज दत्त दत्त लय पावलात होती दत्त दत्त वारा सभोवत गुंजे दत्त दत्त वृक्ष झुडूपात साद ...
-
कुबेरास ****** माझे मज देई तुवा लुटलेले बहु सांभाळले महाधन ॥१ गळ्यात बांधून जगात फिरलो उशाला निजलो घेऊन जे ॥२ असे बरे नव्हे तु...
.jpg)

