शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

दत्त माझा विटेवरी





दत्त माझा विटेवरी
विठू दिसे औदुंबरी
शंख चक्र गदापाणी
मिरवितो श्वान चारी

तया पाहू जाता तिथे
गोड सुटतसे कोडे
जनार्दन एकनाथ
मर्मबंध उलगडे

नाथ पंथी मुळपीठ
वाळवंटी विरूढले
गिरनार ब्रह्मगिरी
भागवती फोफावले

अहो स्वामी देवराया
कुठे कुठे देऊ खेव
माझे मनी ज्ञानदेव
माझे मनी सायंदेव

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


लक्ष्मण


अँम्बुलंस अटेंडंट लक्ष्मणअचानक सिरिअस झाला ,तो खूप एक चांगला कामगार आहे.म्हणून उमटलेली प्रार्थना 


मूर्च्छित पडला लक्ष्मण
लागून अदृश बाण
दिसल्या वाचून वैरी
शक्ती गेली भेदून
शेकडो हात मग
झाले वीर हनुमान
संजीवनी वाचून
वाचविण्या त्याचे प्राण
वाचावा लक्ष्मण
यावा हाती घेवून
तेच त्याचे रजिष्टर
ट्रान्स्फर साठी म्हणून  
हीच प्रार्थना !

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, १० एप्रिल, २०१४

मैत्री

मैत्री हे नात असत
मना मध्ये रुजलेलं
मैत्री हे गाण असत
हृदयात फुललेलं
मैत्रीचे रोप असतं
आपणच लावलेलं
स्नेह प्रेम विश्वासाचे
जल सिंपन केलेलं
सुखदु:खामध्ये साऱ्या
तो साथीदार असतो
पाठीवर थाप कधी
खांद्या आधार असतो
ईवल्याशा रोपाचा त्या
मोठा वटवृक्ष होतो
न मागता देतो घेतो
तिथे हिशोब नसतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

रामाचं हे कोडं




एक बरं हे रामाचं
शांतपणे जगायचं
समोरील जीवनाला 
ना कधी न म्हणायचं |

शत्रूला सरळपणे
युद्धामध्ये मारायचं
प्रियकरा जपायचं
जीवास जीव द्यायचं |

साऱ्याचंच ऐकायचं
साऱ्यांस सवे घ्यायचं
सुखदुःख भोगतांना
सुखदु:खी जगायचं  |

कपटाला वाव नाही
धूर्तते शिरकाव नाही
गंगोत्रीच्या निर्मळास
कधी कुठ अटकाव नाही | 

रामाला श्रीराम असं   
कसं काय होता आलं
एकवचनी सर्वदा
सहजी जगता आलं |

दु:खात बुचकळून
कष्टात घुसमटून
वेदनेत उकळून
कसं टिकता आलं |

रामाचं हे कोडं मला
कधीच नाही कळल
राम राम म्हणे रोज
तसं वळता न आलं |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...