गुरुवार, ४ जुलै, २०१३

प्रेम हवे तर






प्रेम हवे तर
अटी पूर्ण कर
फूट नाहीतर
इथुनिया ||||
ने फिरावयास
मज दूरवर
सुंदर सुंदर
देश दाखव ||||
गाडी हवी मज
घर हवे मज
नजराणा रोज
पेश कर ||||
हवे नटवणे
नवी प्रावरणे
सुवर्ण दागिने
यथोचित ||||
सारे रविवार
भटकू बाहेर
खाऊ मजेदार
नवे डिश ||||
आपण दोघेच
असू राजा राणी
तिसरे कुणी
नको मज ||||
असेल मंजूर
तर मी तुझी
अन्यथा गावची
शोध वधू ||||
असा रोखठोक
माझा व्यवहार
गमेल  व्यापार
तुज जरी ||||
तुही असशील
दमला शोधून
ये मग मोजून
दाम जरा ||||
फुकट मिळते
काय प्रेम ते
जीवन असते
घेणे देणे  ||१०||

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, २ जुलै, २०१३

गुड-बाय !





दारावर लाव तोरण  
रांगोळ्यांनी भर आंगण
जात आहे मी आता
आनंदाने जग जीवन

किती वर्ष मजला तू
केले आहेस सहन
सुखासाठी तुझ्या आता
आडकाठी ना बंधन

त्या तुझ्या सुखास तेव्हा
माझी ना कधी नव्हती
काय करू तुझी माझी
दुनिया वेगळी होती

त्या तुझ्या सुखात माझे
नसणे तुज खुपले
माझ्यासवे म्हणुनी तू
सुख हि दूर लोटले

पहा तुझे अवघे ते
कुढणे आता सरले
ना परतीच्या वाटेला
पावूल माझे पडले

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...