कृपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कृपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

समाधान

समाधान
*******
असे समाधान थेँब अमृताचा 
प्राण साधनेचा साधकाच्या ॥१

समाधानाविना येथे येते न रुजून 
ध्यान हे सजून अंतरंगी ॥२

शांती तयाचे रे असे बाह्यरंग 
देखतसे जग डोळ्यांनी ॥३

आणिक ती दया येते ओघळून 
समाधानातून सर्वाभुती ॥४

सांगती श्री गुरु खूण अंतरीची 
वाट साधनेची शिष्यालागी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

संजय तिकोणे सर (सेवापूर्ती दिना निमित्त )

संजय तिकोणे सर ( सेवापूर्ती दिना निमित्त ) *********************** तिकोणे सर म्हणजे माझा लहान भाऊ संजय !  संजयला आम्ही भावंडं  स...