कार्यकर्ता अन् पोट
***************
मला नेहमी एक प्रश्न पडायचा या कार्यकर्त्यांचे पोट कसे काय भरत असेल
ते साहेबांच पत्र घेऊन धावणारे
विविध कार्यालयात फेऱ्या मारणारे
आवाज करणारे विनंती करणारे
आडनावा प्रमाणेच पक्ष असणारे
काहींचे तंत्र विनंतीचे काहींचे तंत्र दबावाचे
तर काहींचे दादागिरीचे पण सगळ्यात मोठे तंत्र
मोबाईलवरील साहेबाच्या नंबरचे
आणि डीपीवरील साहेबांच्या फोटोचे
तर मग असाच एक कार्यकर्ता झाला
ओळखीचा अन मैत्रीचा
त्याला विचारला प्रश्न मनातला
त्यावर तो हसला आणि म्हणाला
या भानगडीत नकाच पडू साहेब
पण सोपं गणित आहे मोठा वाटा छोटा वाटा
लहान वाटा किंचित वाटा संपले गणित
कळले तर कळले नाही तर द्या सोडून
तसे भेटतात काही साभार आभार
त्यात काम होऊन जातं
लोकांचं काम होतं साहेबाचं नाव होतं
आपलं निभावून जातं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा