सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

देह पसारा



मातीच्या देहाला जपावे किती
मातीस मिळणे मातीला अंती

चार पाच सहा दशके जीणे
इथले गणित सदैव उणे

आधि व्याधि कधी प्रारब्ध आड
वाढते आणिक मरते झाड

जग रे मानसा मरेस्तोवर
नाव गाव टिंब नसे नंतर

विक्रांत सोड रे व्यर्थ पसारा
आता तरी आत फिरे माघारा 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चाकरमानी

चाकरमानी ******** पोटाला पाठीला  पिशव्या बांधुनी कामाला निघती हे चाकरमानी ॥ चाकरमान्याच्या  डोळ्यात घड्याळ देहा चिकटली  लोकलची व...