गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५

देतसे फेकुनी






पुरे झाली आता
देतसे फेकुनी
दिल्या कटोऱ्याची  
जिंदगी भिकारी

पुन्हा घेवूनी
हातात  शस्त्र
टाकतो बंधन
तोडूनी सारी

साहिल्या वेदना
अपमान वंचना
घेतोय श्वास
ती ही लाचारी

नकोत सुखाचे
तुकडे आता
नकोच दु:खाचे
ओझे उरावरी

कुणाचा दास मी
दाता कुणीकडे
युगांचा प्रवास
तीच ती चाकोरी  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

भाजी जळली





आणि शेवटी
भाजी जळली
कढी फाटली
उकळीने

तसे मला तर
जमलेच नाही
कधीच काही
सैपाकाचे

आणि लाखदा
सांगून तिने
जळणे उतणे
टळले नाही

आता हातात
ब्रेड आम्लेट
कच्चे खारट
ईलाज नाही

हवेच होते
थोडे शिकाया
अन ढवळाया
डाळ वगैरे

विक्रांत प्रभाकर


शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

व्यर्थ अध्याय नवा





जगण्याचा अर्थ मागे
रोज तुझ्या दारावरी
आणि मिळे रोज तोच
प्रसाद या हातावरी

तेच तेच कितीवेळा
शिणलेले दु:ख जीवा
अन चाललेला तुझा
व्यर्थ अध्याय नवा

किती तर्क सिद्धांत ते
कशालाच अर्थ नाही
अरे तुझ्या तेजाने त्या
दिवाही पेटत नाही

धावणारे धावतात
कावणारे कावतात
परी अंती मसणात
त्या तसेच जळतात

चल जातो आज पुन्हा
येणे सुटणार नाही
यंत्रवत शिणलेले
शब्द थांबणार नाही  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...