शनिवार, २५ जानेवारी, २०२०

स्वामी कृपा






स्वामी कृपा

*********



स्वामींच्या कृपेने

जाहलो स्वामींचा 

घेतला प्रेमाचा

नुभव II

धावला संकटी

इवल्या सेवेनी

जाहलो मी ऋणी

जन्माचाच II

मणाचे ते ओझे

मिटले क्षणात

सुख आयुष्यात

ओघळ्ले II

आता विनवणी

तया योगीराया  

सेवेसही काया

वाहू दे रे II

घेतलेस पदी

राहू दे असाच

निशंक मनास

करूनिया II

विक्रांत स्वामीचा

होय नामधारी

दत्त वारकरी

आयुष्याचा II

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

होऊनि दत्ताचा





करुनी निशस्त्र रणी मज दत्ताने पाठविले आहे
करुनी हार माझी जनी बघ साम्राज्य दिले आहे

देहावरी वार खोल मी आदरी मिरविले आहे 
शिकविणे सारेच असे फक्त त्यास जमले आहे

कौतुक या सुखाचे अन् लडीवाळश्या दुःखाचे
निजवून भूवरी मज वर आकाश रेखाटले आहे

येती मुखातून स्वर जे ते सारेच सुख हुंकार आहे 
व्यापून सदा जीवनाने मज साक्षीत ठेविले आहे

मी होऊनि दत्ताचा जगी या सहज वावरत आहे
म्हणते जग सुटला विक्रांत कुणी तया बांधले आहे  

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

दत्ता दिलीस का ढील



 दत्ता दिलीस का ढील
 ***************

दत्ता दिलीस का ढील 
तुझा बहकला बैल 

दूर हिरवी कुरणं 
गेला सावज होऊन 

उगा उधळे चौखूर 
तुझा पडून विसर 

मग घेरले वृकांनी 
स्थिती झाली दीनवाणी 

साद घालतो तुजला 
धाव धाव रे कृपाळा 

घाल वेसन नाकात 
दोर ठेवी रे हातात 

तुझी ओढीन रे गाडी 
नाही धावणार झाडी 

नेक आठवत पथ 
दत्त  वदत विक्रांत



 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, २२ जानेवारी, २०२०

दत्त कृपाळू


दत्त कृपाळू
***********

दत्त कृपाळू कृपाळू
जणू मूर्तिमंत छळू

दत्त मायाळू मायाळू
लावी ह्रदयासी जाळू 

दत्त आधारू आधारू
देतो धक्काची उतारू 

दत्त वेल्हाळ वेल्हाळ
जणू उरावरी काळ

दत्त सोयरा सोयरा
गळा बांधतसे दोरा 

दत्त विक्रांते सोडला
येत दत्ताने गिळला 

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...