माताजी निर्मलादेवी
(मी माता निर्मला देवीचा भक्त नाही किंवा त्यांचा सहज योगाचा अनुयायी सुद्धा
नाही
तरीही एक दिवस एका ठिकाणी अनपेक्षितरित्या जाणे झाले तिथे निर्मला देवींचा एक छान मोठा फोटो होता त्यासमोर नुसताच बसलो होतो तेव्हा आलेला हा अनुभव .)
चैतन्य सळाळे
फोटोत सजले
पूजा पालवले
भक्तांचिया ॥
कृपेचा प्रसाद
होता ओघळत
प्राण उर्ध्व होत
आसमंती ॥
कां ग माय अशी
करिशी करूणा
जरी मी पाहुणा
तुझे दारी ॥
कैसी ही घडी नि
कैसे येणे जाणे
परी तुझे देणे
कालातीत ॥
माता निर्मलाजी
माय जगताची
सहज योगाची
अधिष्ठात्री ॥
आई जगदंबा
काय वाणू तुला
लागतो पायाला
विक्रांत हा ॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
|
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
मंगळवार, २६ मार्च, २०१९
माताजी निर्मलादेवी
सोमवार, २५ मार्च, २०१९
मासेवाली
मासेवाली
********
पुन्हा पुन्हा
मुन्शिपाल्टी
जरी तिचे छत तोडी
पुन्हा पुन्हा मासे
वाली
नवे आणूनियां जोडी
झाडाखाली तिच्या
तीच
हक्काचीच असे जागा
टाप नाही कुणाचीच
घेण्या तिजसी रे
पंगा
पापलेट सुरमई
वाम बांगडे करली
झिंगा कोळंबी मांदेली
पाटावरी मांडलेली
जरब डोळ्यात तिच्या
शब्द आणि धारधार
नजरेत येणाऱ्याला
एकाच ती तोलणार
सोन्याची माळ गळा
कुंकू भाळी लावलेले
अबोलीच्या
वेणींमध्ये
फूल कधी खोचलेले
रोजचेच गि-हाइक
बहुतेक ठरलेले
कमी जास्त जरी चाले
विश्वासाने भरलेले
अविरत कष्ट तिचे
जीवनाच्या समरात
रुद्र शांत दिसे काली
टेंबीयांच्या प्रकाशात
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
रविवार, २४ मार्च, २०१९
ॐ गणेश
ॐ गणेश
गणेशा प्रती हे
मन लाेभावते
जडून राहते
निरंतर
गणेशाची छबी
येता चित्तावर
आनंद लहरी
देह होतो
सूत हा शिवाचा
अंतक विघ्नांचा
तारक भक्तांचा
कल्पद्रुम
ओघळते सुख
गणेशासोबत
दुःख क्षणार्धात
दूर जाते
गणेश कृपेने
दिशा ती दिसती
गतीही मिळती
सर्व कार्या
म्हणून तयास
हृदयी धरावा
प्रथम वंदावा
सर्वभावे
तया प्रकाशाने
विश्व उजळतेे
आनंदे भरते
कण कण
गणेश भक्ताला
कसली फिकीर
हात पाठीवर
त्याचा सदा
देवा विनायका
रहा स्मरणात
शब्द कौतुकात
विक्रांतच्या
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
शनिवार, २३ मार्च, २०१९
फकीरीची हाव
फकीरीची हाव
***********
मज फकिरीची
देवा असे हाव
फळण्या उपाव
करी काही ।
छत आकाशाचे
निजण्या अवनी
ऐसे स्वप्न मनी
सदा सजे ।
वृक्षांची संगत
पशूंची सोबत
यामिनीचे तट
भेटो वाटे ।
कुठल्या दारात
टिचभर पोट
भरे दो घासात
फार नको ।
पानं फुलं कंदी
घडावे पोषण
तुझ्यात हे मन
व्हावे गुंग ।
अलख मुखात
अनहलक यावे
तुझाच मी व्हावे
दत्तात्रेया।
कुठल्या जन्माचा
असावा हा सोस
विक्रांत उदास
तयाविना ।
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
http://kavitesathikavita.blogspot.in
शुक्रवार, २२ मार्च, २०१९
दत्ताच्या गावाला
भक्त हा चालला
**************
दत्ताच्या गावाला
भक्त हा चालला
जगाच्या डोळ्याला
वेडा हा जाहला
वाटेविना वाटे
हा चालू लागला
अंधारी अंधाराला
नि पाहू लागला
पाहिलेले स्वप्न
खरे मानू लागला
निद्रेत निद्रेला
हा हसू लागला
पथी सोबतीला
न कुणी तयाला
तरी गाव गोळा
करीत चालला
ना इथे थांबला
तो तिथे चालला
भूत भविष्याला
गिळूनी राहिला
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
गुरुवार, २१ मार्च, २०१९
दत्त ध्यानी
दत्त
ध्यानी
***********
दत्त
ध्यानी दत्त मनी
दत्त कानी अविरत
दत्त घरी दत्त दारी
व्यवहारी
दत्तनित्य
दत्त
जनी दत्त वनी
वेटाळूनी कणोकणी
दत्त
गाणं दत्त भान
शब्द
रान सुटलेले
दत्त ओठी दत्त पोटी
काठोकाठी भरलेला
दत्ता पाहू कुठे कुठे
विश्व
रिते दत्ता विन
दत्ता
देही श्वास होई
प्रेम
देई विक्रांता या
|
|
|
|
|
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
http://kavitesathikavita.blogspot.in
*************:
बुधवार, २० मार्च, २०१९
लायक तोच करतो
दत्त वाटेवर जन्म चालतो
त्याच स्वप्नात नित्य जगतो ॥१॥
त्याच स्वप्नात नित्य जगतो ॥१॥
पुण्य खडावा ह्रदयी धरतो
सदैव अलख अंतरी गातो ॥२॥
सदैव अलख अंतरी गातो ॥२॥
दत्त मजला आपुला करतो
अन या उरात प्रेम भरतो ॥३॥
दत्त जन्म मरण वारतो
दुस्तर मायेतून निवारतो ॥४॥
दत्त विक्रांता सदा सावरतो
त्याचिया लायक तोच करतो ॥५॥
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
http://kavitesathikavita.blogspot.in
*************:
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
परिक्रमा
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
पदन्यासी ******** कुणाच्या पाऊली वाजती पैंजणे उधळते गाणे पदन्यासी ॥१ काही मिरवणे होते हरवणे काही रे जगणे प्रकर्षाने ॥२ देह ...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
आले बोलावणे ************ आले बोलावणे आले गिरनारी अधीरता उरी अनावर ॥ घडेन दर्शन घडेन परत दिव्य स्पंदनात भिजेन मी॥ पाहीन पावुले दत...
-
जैसा गरुड तो नेतो उचलून मासा अलगत पायी पकडून तैसे मजला घेई ओढून दत्तराज खग बलिष्ठ होऊन सुखासीन मी या जगतात हरवून गेलो माझ...
-
मावुली ***** तृषार्थ जगता पाहुन द्रवला कृपा अंकुरला महावृक्ष जरी विश्वाकार देहात कोंडला अन बहरला घनदाट ॥ बीज करूणेचे बीज चैतन...
-
अंगणात ******** माझ्या देवघरी सगुण खेळणी ठेवली मांडूनी एक एक ॥ १ लंगडा श्रीकृष्ण वाघावरी आईं उपदेश देई दत्तात्रेय ॥ २ गोड गणपत...
-
ही कविता डॉक्टर रजनी जगताप यांच्यासाठी डॉक्टर बिना अपोतीकर यांनी लिहिलेली आहे या कवितेचे भाषांतर करण्याची विनंती डॉक्टर रजनी यां...
-
शल्य **** पुन्हा पुन्हा तुझे गाणे मनात या उमटते त्याचं शब्दी त्याच वृत्ती पुन:पुन्हा जन्म घेते ॥ पुन्हा पुन्हा तीच वाट मज नागमो...
-
कल्पद्रुमा *** मज दत्तराया छळते ही काया जन्म जाई वाया तुजविन ॥ जैसे रक्षिलेस मच्छिंद्र गोरक्षा तैसा मज रक्षा भगवंता ॥ जैसे प्रेम दिले जा...






