बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

बाराव्या अध्यायी






बाराव्या अध्यायी थांबलो अडलो
भक्तीसी जाहलो सादर मी।।।।
कळेना मनाला ।काय वाचू पुढे 
जाहले एवढे ।ओझे मज।।।।
दडपली छाती ।पाहुनिया ज्ञान।
क्षण एक कण।मज पुरे।।।।
परी माऊली ती। धरुनिया हाती।
सवे चालविती।सदोदित।।।।
कळेना घुसते ।काय  टाळक्यात।
शब्द मंदिरात।सेवक मी।।।।
कृपाळू अनंत। सखा ज्ञानवंत।
म्हणुनी  विक्रांत।धीर धरी।।।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

शब्दच्छल





ब्दच्छल

निर्थकता जीवनाची
माझ्या मला कळाली
अवघीच जिंदगानी  
का ओघात चालली

म्हणतात कुणी इथे
श्रेय तयास मिळाले
रे आम्हा काय फिकीर
काय कुणास मिळाले

रिकाम्याच झोळीचे या  
ओझे आता मी जाणले 
होवो आता कडेलोट
वा राहो पाणी साठले

भजने माझीच होती
माझीच अंध मग्रूरी
मनाचाच खेळ सारा
चित्रे धुरातील सारी

चला झाला पुरे आता
ब्दच्छल मांडलेला
मरणात या क्षणाच्या
हा श्वास आहे चालला  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...