शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

दत्ताच्या अंगणी




आम्ही दत्ताच्या अंगणी
गेलो नामात रंगुनी ||
कधी जन्मास येवूनी
कधी गेलो रे मरुनी| ||

शब्द भरले भरले
नाद लयी हरवले ||
मध्य अंतरी थांबले 
गूढ शून्यात विराले ||

कोण दिसले दिसले
शुभ्र तेजात बिंदुले ||
निळ्या प्रवाही ओतले
घडे युगांचे भरले ||

कृपा करूनी प्रभूनी
मार्गी आणले ओढूनी
नाम विक्रांत जाणुनी
गेला नामात वाहुनी ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे




आकार मिटला



आकारी असुनी 
आकार मिटला
हरवूनी गेला 
पोकळीत ||१
दुरून लांबून 
प्रकाश वरून
खोल नळीतून 
घडे यात्रा ||२
श्वासांचे बंधन 
पडले म्हणून
आलो परतून 
उगाचच ||३
कसे नेले कुणी 
आणले परत
नच अवगत 
झाले जरी ||४
दावून झलक 
गेला प्रकाशक
अंधाराचे बीक 
मोडीयले ||५
विक्रांत निशंक 
होवूनिया थेट
चालू लागे वाट 
ठरवली  || ६

विक्रांत प्रभाकर तिकोणे



संताच्या पावुला…



काय खोटे काय खरे
आम्हा नसे ठाव बरे  ||
आम्ही ठेविले डोईला
भक्त संताच्या पावुला ||
त्यांनी पाहिला कळला
मार्ग आम्हास भावला ||
त्यांचा थोर कळवळा
आम्हा आत उमगला ||
हे तो चालतेच देव
उभे सामोरे सावेव ||
त्यांचे जीवन आकाश
करी मनात प्रकाश ||
विक्रांत होवुनी धूळ
राही पायासी केवळ ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे




कृपेची होय बरसात




तुझिया कृपेची होय बरसात
अपार श्रीमंत झालो आज ||१||
काय कुठे ठेवू कळेना मनाला
जीव भारावला हरखून ||२ ||
खरे खोटे काय चिमटा घेवून
घेई आकळून जागेपण ||३||
मोकळे जाहले आज मी पण
उरले कारण धारणेला  ||४ ||
मागितल्याविन उगवला क्षण
आनंद दाटून आसमंत ||५ ||
नव्हते आसन त्रिकुटीत मन
खुले नभांगण छतावरी ||६ ||
तरीही तोच मी जाणीव तरल
व्यापुनी केवळ उरलेलो||७ ||
कोण तो विक्रांत कुठे हरवला
असुनी नसला देखियेला ||८||

विक्रांत प्रभाकर तिकोणे

दत्तनाम औषधाने




दु:खे दाटुनिया दत्ता
जरी बरळलो काही
घाली अपराध पोटी
मज अन्य कुणी नाही

आहे मनच शेवटी
तुज सारेच माहिती
किती सांभाळू तयास
जाते खेळायला माती

जरी माखलो पापाने
चित्त दुश्चित्त तापाने
सारे होईल निर्मळ
तुझ्या पावन कृपेने

दत्तनाम औषधाने  
सरते व्याधींचे केले
मना धुवून पुसून
दत्ता पदास वाहिले 


विक्रांत प्रभाकर तिकोणे

दत्त मिळवला



उद्याचा व्यापार
दिला मी सोडून
टाकले मोडून
दुकानास ||
चोरी गेले सारे
ज्याचे त्यांनी नेले
ऋण मिया केले
दत्तावरी ||
घालील तो खेटे
उगा परोपरी
दृष्टी माझ्यावरी
ठेवील ही ||
ऐसा हा उद्यम
मांडे फायद्याचा
कृपाळू भिक्षेचा
याचक मी ||
विक्रांत लबाड
उठाठेव केला
दत्त मिळवला
ठकवून ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे



बोलविता धनी माझा दत्तराज








बोलविता धनी माझा दत्तराज

करतो मी काज लिहायचे ||

हृदय कुहरी पेरितो गुपिते

मज न कळते कुणासाठी ||

लिहीलेले सारे नसे माझे काही

केले भारवाही त्यांनी मज ||

जया हवे त्यांनी सुखेची ते घ्यावे

दत्ताला भजावे सर्वकाळ ||

झाली बहु कृपा लागलो सेवेला

आलासे कामाला जन्म माझा ||

अर्थ हरवला चुकली अक्षरे

विक्रांत पामरे क्षमा करा ||



विक्रांत प्रभाकर तिकोणे


 ----------------------------------------------------------------------


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...