बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

बगाडे सिस्टर...







आपण नोकरी का करतो
अन कुणासाठी करतो
हे ज्यांना पूर्णपणे माहित होते
अश्या काही विरळ लोकात
बगाडे सिस्टरांची गणना होईल
घर संसार मुली पती आणि आता नातू
यांच्या विश्वात रंगून गेलेल्या सिस्टरांनी  
व्ही.आर. एस. ला उशीर केला हेच नवल   
अश्या प्रेमाच्या अनुबंधात गुंतलेल्या  
कौटुंबिक स्नेहात रमलेल्या सिस्टरांना
त्यामुळे कामाचे ओझे कधी जाणवले नाही
आणि त्यांनी तो मनावरही घेतले नाही
सहजपणे सगळ्यांना जवळ करत .
शांतपणे न पटणाऱ्या पासून दूर राहत
कुणाच्या अध्यात मध्यात न पडता  
त्यांनी आपली नोकरी केली
आणि आता ज्या कुटुंबाच्या सुखाचा ध्यास
त्यांनी आयुष्यभर घेतला
ज्या कुटुंबातच मनाने सदैव राहील्या
त्यांच्यात पूर्णवेळ राहायला त्या जात आहेत
जिवलगांच्या प्रेमात आनंदाने
जगण्याची कला त्यांना साधली आहे
ती तशीच राहो हीच त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

डॉ .गिरीश भट (श्रद्धांजली)




मैत्रीच्या परिघातील दूरवरचा तारा
पुष्कळ दूरचा अन खूप जवळचा
नाकासमोर चालणारा साधेपणा
पापाला नाकारणारा सच्चेपणा
देवाला मानणारा भिरुपणा
त्याच्या बोलण्यातून
वागण्यातून प्रगट व्हायचा

स्वतच्याच कवितेत रमणारा
कवितेचा आधार घेणारा
काव्यप्रेमी रसिक
त्याच्यात सतत दिसायचा
खरतर कधी असे वाटायचे
या मुन्सिपाटीच्या जगात
हा माणूस एकदम अनफिट आहे
इतके सज्जन सरळ कुणी असते का कधी
अन म्हणूनच कदाचित
शेवटी व्ही आर एस घेतला त्यांनी 

पण नंतर सगळं काही व्यवस्थित चालू असतांना
शांतपणे जगतांना तशीच अचानक
जीवनातून व्ही आर एस घेतील ते   
असे कधी वाटले नव्हते
खरतर नोकरीतून बाहेर पडल्यावर
खूप बोलायचं होते
गप्पा मारायच्या होत्या
कवितेबद्दल अन घराबद्दल
मुलगा त्याचे भवितव्य व परदेशागमनाबद्दल
पण वेळ भेटलाच नाही
अन काळ कधी हातातून निसटला
हे कळलेच नाही 

स्वामी समर्थांना शरणागत
हरी हरात समर्पित
एक निरागस सुशील शांत माणूस
मैत्रीच्या दूरवरील क्षितीजातून
लख्खकन चमकून निखळला
अशी माणसे दुर्मिळ असतात
अन वाटले अरे या माणसाशी
अजून जवळीक व्हायला हवी होती
खरंच मैत्रीला जिवलग करायची
एक संधी निसटून गेली होती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

जगणे फार सुंदर असते






अर्धे टक्कल केस पांढरे
अरे माझे प्रेम लाजरे

गुढगे सुजले पोट सुटले
परी चांदणे मनी सजले

कालच माझा मित्र वारला
माझा जीव इथेच अडकला

बोटावरती वर्ष राहिली
परी स्वप्ने नाही मिटली

म्हणोत तृष्णा कुणी तिला
म्हातारचळ अथवा लागला

अरे होवू दे जे होते ते
जगणे फार सुंदर असते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०१५

तू स्मरावा






तू स्मरावा  
हृदयी राहावा
म्हणून धावा
माझा ||
तू कळावा
जन्म फळावा
म्हणून धावा
माझा ||
या हाकेची
या धावेची
कधी व्हायची
पुर्ती ||
हे नच कळते
मन ठेचाळते
अन भळभळते
विद्ध ||
दिन सरतो
जन्म संपतो
काळ डसतो
उरी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...