मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

गर्भाचा गोळा




कचरा कुंडीत
गर्भाचा गोळा
नाजूक कोवळा
मुंग्यांनी भरला

आदिम शिकारी
भुकेला आंधळा
धावून आला  
तुटून पडला

स्पर्शल्या वाचून
दुध ओठाला
सूर टॅहॅचा
हरवून गेला

नूतन मृदुल
कोरला पुतळा
आताच उमटे  
आताच फुटला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

एका मैत्रिणीला ..





अग वेडे खरे प्रेम खरच
काही मागत नसते
देणे घेणे त्याच्या हिशोबात
मुळीसुद्धा नसते  
प्रेमासाठी फक्त एकदाच
प्रेम करून बघ
लाख दु:ख येवू देत  
पण जीव देवून बघ  
प्रेम भेटते क्वचित कुणाला
सांगू काय मी अधिक तुला
कधी उशिरा कधी लवकर
काळ मोजत बसू नकोस
आजची संध्याकाळ ही
अन वाया घालवू नकोस
भेटेल जेव्हा तुझा सखा  
निसटून त्या देऊ नकोस
असतील इथे काही लुटारू
म्हणुन मागे फिरू नकोस  
लाव निकष कर परीक्षा
पण हातून घालवू नकोस


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

आता कैसे गाऊ





आता कैसे गाऊ
सांग तुझे गुण
चाकाटले मन
शब्दहीन ||१
बोलू जाय तरी
श्वास कोंदाटून
राही घोटाळून
अंतरीच ||२
लिहू जाय तरी
जातात वाहुनी
अक्षरे भिजुनी
आसवांनी ||३
बोललो तितुके
तुझेच कौतुक
दुबळा वाहक
वावटळी ||४

विक्रांत प्रभाकर

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...