जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
गुरुवार, ८ जानेवारी, २०१५
सोमवार, ५ जानेवारी, २०१५
गूढ डोहात
पुन्हा डोकावले
गूढ डोहात
पुन्हा पाहिले
त्या अंधारात
थोडे पाणी
हलले फिरले मीच मजला
पुनरपि दिसले
अन सावल्या
मनातल्या
मनास मग
हळूच कळल्या
कुणी तोडले
अलगद आले
दुख प्यायले
हासू सजले
काय भेटले
काय हरवले
खळखळ ना
कलकल केले
तरीही पाणी
वाहून गेले
गाणे झाले
जल कणकण
मग मोहरले
प्रकाश प्राशिले
मन तृषार्थ
ओठ थिजले
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
रविवार, ४ जानेवारी, २०१५
तिच्यावरच्या कविता
तिच्यावरच्या कविता
ती आता वाचत नाही कुठूनही कधी तिची
प्रतिक्रिया येत नाही
तर मग कश्यासाठी
लिहावे मी हे कळेना प्रयोजना वाचून त्या
पावूल पुढे पडेना
बऱ्याच वेळा वाटते
आता लिहिणे थांबवावे या साऱ्या वह्यांना
फडताळात टाकून द्यावे
पण काही कारणाने
सुरु केले दारू पिणे कारण नाहीसे होवूनही
चालू राहते अव्याहतपणे
तसा रोज लडखडत मी
त्याच त्या मधुशाळेत येतो मीच विकतो मीच पितो
मीच मरतो आणि जगतो
किती काळ पण माहित नाही
माझा काही भरोसा नाही दिवस दावते शब्द कधी हे
विझून जातील कळत नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
निरोप
निरोप ( विसर्जन) ***** आलास आता आताच अन् पुन्हा निघालास कसे दिवस उलटले कळले नाही कुणास ॥१ तुझे स्थान हृदयात जरी का नित्य अस...
-
डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खरे जे डॉ .मनीषला ओळखतात त्यांना सांगायची ...
-
संजय तिकोणे सर ( सेवापूर्ती दिना निमित्त ) *********************** तिकोणे सर म्हणजे माझा लहान भाऊ संजय ! संजयला आम्ही भावंडं स...
-
स्वीकार ******* करी रे स्वीकार माझा मायबापा आगा दयारूपा माझे म्हणा नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती परी उपरती खरी असे व्यर्थ म...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
दत्त दत्त दत्त मुग्ध झाले चित्त सदोदित गात तेच नाम ll १ ll आणि आठवत कृपाळू ते स्मित आनंदे व्यापत ...
-
निरोप ( विसर्जन) ***** आलास आता आताच अन् पुन्हा निघालास कसे दिवस उलटले कळले नाही कुणास ॥१ तुझे स्थान हृदयात जरी का नित्य अस...
-
वेदनांनी झोळी माझी सारी भरू दे रे अल्लाह मग हवे तर मज पूर्ण वेडा होवू दे रे अल्लाह चंद्र कधी तारे तुज मी सांग मागितले होते स्वच्छ हृद...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
वठताच वृक्ष ********** वठताच वृक्ष पक्षी उडून जातात घरटी खाली होतात आणि उरते ते फक्त वृक्षाचे एकटेपण त्यात पक्ष्यांची काह...
-
मिठीत जगणे होते मिठीत मरण आले हाती जपायचे होते हातीच सारे संपले मोडुनी घर पडले स्वप्न मातीत सं...


