बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

श्रीहरी गारुडी






येवूनी डसता
विकार विखारी
धावला श्रीहरी
गारुडी तो ||
करता स्मरण
दत्त समोर
सरले समर
क्षणार्धात ||
तयाचे लाघव
करुणा तयाची
माझिया मनाची  
धाव खुंटे||
सरले मळभ
जीवा जडलेले
विश्व उजळले
तया रुपी ||
असे देवराये
केले कृपांकित
अविट अद्भुत
अनुभव ||


विक्रांत प्रभाकर






मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

विरताच मेघ






विरताच मेघ
दिसले आकाश
दाटला प्रकाश
सभोवार ||१||
उतरले ओझे
साचले मनात
जरी ना माहीत
पुढे काय ||२||
थोडी जीवनाने
दिली मज आशा
प्राणात पिपासा
संजीवक || ३||
कुणाच्या हळव्या  
शब्दातील ओल
हृदयात खोल
अंकुरले || ४||
उगे थोडेसेच
हवे आहे जिणे
प्राणांचे पेटणे
खरेखुरे ||५||
आणि काय मागू
तुजला मी आता
तुजवीण चित्ता
थारा नाही ||६||
सांभाळ अथवा
नाकार सर्वथा
पडलो मी पथा
तुझ्या खरा  ||७||

विक्रांत प्रभाकर





सोमवार, १ डिसेंबर, २०१४

व्हाटसअपवर ब्लॉक होता





जेव्हा तिने मला फेसबुकवर अन्फ्रेंड केले
अचानक व्हाटसअपवर ब्लॉक करुन टाकले  
साऱ्या माझ्या कवितेंचे भांडवल बुडाले
दिवाळखोर मी मला जाहीर करून टाकले  

कळेना आता इथे मी गाणी लिहू कुणासाठी
एका फुलासाठी सारी दुनिया सजली होती
मित्र म्हणत होते रे तुझी प्रतिभा बहरली     
कशी काय तुला ही छान कविता सुचली

अंदरकी बात सारी अंदरच आता राहिली
बहुदा या कवितेंनीच विकेट माझी घेतली
काही म्हणा पण ही अगदीच टिपिकली
या कवीची ठरीव काव्यकहाणी संपली

बहुदा तिचे कुठेतरी लग्न ठरले असावे
घरच्यांनी मित्रांनी कान फुकले असावे
घाबरून मग तिने असेल पाठ फिरवली
बेहतर सुंदर ऑफर किंवा दुसरी आली

ज्यांनी केले पाप तो ते जरूर भरेल
कावळ्याच्या शापाने बगळा जरूर मरेल
तोवर बिचारा कावळा शब्दाविना रडेल
कुहूकुहू सारे जगता काव काव गमेल
..........
नुकतीच कपाटात वर ठेवून दिलेली
ब्रह्मसूत्रे मी पुन्हा शोधून काढली
शंकरभाष्यावरील धूळ अन झटकली
अथतोची ..टकळी पुन्हा सुरु झाली

सगळीच माया ही सगळीच छाया असे
वाचीत ओळ आता ती मी पुन्हा बसे  
तिचेच चित्र पण ते पानोपानी फडफडे
हसणे रुसणे बोलणे अन कानावरी पडे  


विक्रांत प्रभाकर

आधार

आधार ****** देव का रे कोपतो हा रागावून कुणावरी  देव का रे धावतो हा आपल्या त्या कुणासाठी  देव का रे राखतो हा  दुजा भाव मुलांसाठी ...