मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

प्रीत लपविणार नाही





नाही सखी
या मनातून
नाही कधीच
उमटत नाही

आणि माझी
वेडी प्रीत
अजून मागे
सरकत नाही

सारे अडथळे
फोल असून
मार्ग मुळी
सापडत नाही

सदैव पेटले
प्राण तरीही
वर्षा मुळीच
मागत नाही

येशील कधी वा
येणार तू नाही
माझे जीवन
ओलांडून सहज
जाशील पुढेही

नाकारही मला
तो हक्क
आहे तुला
हट्ट तुझा मी
धरणार नाही

प्रीत पण
तुजवरची
मी आता
लपविणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

हवी असते तू मला..





क्षणभर दिसणारी
कणभर मिळणारी
हवी असते तू मला
पूर्ण मन भरणारी
तुझा स्पर्श हवा मज
स्वप्न जाग आणणारा
तुझा श्वास हवा मज
देही प्राण फुंकणारा
तुझे हात हाती घ्यावे
माझे गाणे तूच व्हावे
मिटलेले जग जुने
पुन्हा बहरून यावे
पण तसे होत नाही
चंद्र हाती येत नाही
झाकोळून काळोखात
आस तडपत राही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

मरण उर्मी







इवला देह विष पिवून
देतसे टाकून
कलेवर
कोवळा जीव मैथुनी मरुनी
जातसे मिटुनी
मातीमध्ये  
मरण उर्मी इवल्या मनी
व्यथा होवुनी
संपून गेली
आणि पिसाट लुब्ध विखारी
जाइ माघारी
जगायला
कसले जग नरक केवळ
खाटिक सबळ
गोरक्षक

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

अशीच येतेस




अशीच येतेस अन मला
एक गाणं देवून जातेस
उगाच हसतेस अन मला
माझा विसर पाडून जातेस
वेडे व्हायचे तसे माझे
वय आता राहिले नाही
प्रेमा मध्ये धुंद होणे
पण अजून सरले नाही
साराच बहार वसंतातील
हाती हवा का पडायला
खूप असे हे सौख मिळे
डोळ्यांना या हृदयाला
सारे दु:ख हलके होते
देहामध्ये या भिनलेले
मनामध्ये पुन्हा जागती
सूर काही अन विझलेले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...