जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शुक्रवार, ४ जुलै, २०१४
गुरुवार, ३ जुलै, २०१४
मागणे !
मला माझी
पाटी स्वच्छ
पुसायला
बळ दे |
पळणाऱ्या
मनाला या
थांबावया
वेळ दे |
तुझ्या दारी
उभा आहे
सदोदित
जाग दे |
चुकलेला
पथ माझा
येवूनिया
साथ दे |
रडूनिया
झाले फार
हसण्याचे
वर्म दे |
पिसाट या
जीवनाला
जगण्याचे
कर्म दे |
मागतांना
मागण्याचा
अंत साऱ्या
होवू दे |
प्रेम दीप
तुझा मनी
रात्रंदिनी
तेवू दे |
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
बुधवार, २ जुलै, २०१४
प्रेमाला मी भीत आहे
कलंकित देह माझा
कलंकित मन आहे
पदी तुझ्या वाहू कसं
मलीन जीवन आहे
फसलेल्या जन्मातील
एक रानभूल आहे
लुटलेल्या बागेतील
फेकलेलं फुल आहे
नाव तुझे घेवू कसं
उरामध्ये खंत आहे
अपमान वंचनेत
अजुनी जळत आहे
तुझे हात आश्वासक
मज धीर देत आहे
डोळ्यातून कृपा प्रेम
बरसात होत आहे
वदलास कधी कुठ
प्रेम देहातीत आहे
मागील ते तुझं सारं
भूतकाळ फक्त आहे
येशील तू कधी तरी
सदैव स्वागत आहे
नात्या पलीकडचं हे
तुझं माझं नात आहे
सुखावते ऐकुनी मी
माझं कुणी इथं आहे
जळलेलं मन पुन्हा
उमलून येत आहे
तुझी प्रीत तुझं गीत
सुख पालवीत आहे
अजूनही माझ्या पण
प्रेमाला मी भीत आहे
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
सोमवार, ३० जून, २०१४
उगाच येवून
उगाच येवून उगाच बसून
काहीतरी मी गेलो बोलून
नव्हते देणं नव्हते घेणं
बस भेटावं वाटलं आतून
वृक्ष देखणा खिडकी बाहेर
डोलत होता हळू वाऱ्यावर
एक पाखरू पंख मिटून
बसले होते उगा भिजून
निळे आभाळ स्तब्ध गहन
हळूच आले आत ओघळून
अन मनीची ती तळमळ
सहज झाली शांत नितळ
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
वाट (नर्मदा काठावरील कविता)
वाट (नर्मदा काठावरील कविता) ******* देही सजलेली वाट मळलेली उधळून माती नभी दाटलेली तीच तीच वाट जरी पायाखाली हर दिन नव्या स्पर्...
-
पाडगावकर एक असे कवि होते की त्यांचे अन मराठी मनाचे सूर जणू काही एक झाले होते सदाबहार तारुण्याचे वरदान घेवून आलेली ...
-
सर **** कधी ओघळेल प्रभू प्रेम सर मनी झरझर तृषार्थ या ॥ कधी ओलावेल मृतिका चित्तीची रुजेल भक्तीची बी बियाणे ॥ कधी विरूढेल ज्ञान...
-
कृपा (नर्मदाकाठ च्या कविता ) ******* माई तुझी कृपा अनंत अपार चाले पायावर देह माझा ॥ अगा हे चालणे असे तुझे देणे अन्य न मागणे मज...
-
डुकरांच्या गल्लीतून **************** डुकरांच्या गल्लीतून असे येणे जाणे घरी मग चावणारच डुक्कर कुणा कधीतरी काळी पांढरी हिरवी निळ...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
माझी नर्मदा परिक्रमा ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...
-
मला भावनांचं अवडंबर नव्हतं मांडायचं खरतर पण माझ्या डोळ्यास पाझर मला ओढाळ प्रेमावर नव्हतं लिहायचं खरतर ...
-
उधारी ***** ठेवू नको देवा कुणाची उधारी माझ्या उरावरी येथे आता ॥ १ फिटू दे रे कर्ज माझे हे सव्याज नको देवा लाज आणू मज ॥२ कुणाच्...
-
भय *** किर्र निर्मनुष्य अश्या जयंती माता जंगलात मऊ मातीत उमटलेली ताजी व्याघ्र पावुले अन् एकटेपणी चाललेली माझी परिक्रमा . वि...
-
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...


