शुक्रवार, २७ जून, २०१४

ती स्थळाचे सांगताच



ती स्थळाचे सांगताच 
प्रभा मनातील काजळते
वेडे हृदय का न कळे    
इतके असे कुणात गुंतते
आवडणे तिचे मनाला    
अगदी खरेखुरे असते
आणि झुरणे मनातील  
विलक्षण सुंदर असते
हवेपणाला त्या माझ्या
हट्टाचे जरी कोंदण नसते
तिच्या वाचून जगणे पण
एक असह्य शिक्षा असते
हजार भिंती हजार अडसर
भयकंपित मन कातर होते
पण जुगारी डाव लागता  
जगणे मरणे हाती नसते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २६ जून, २०१४

मेहरनजर





हजार वाटा तुझ्यासाठी
रथ हजारो रस्त्यावर
हजार हृदय अंथरली
फिदा रेखीव चेहऱ्यावर

लाखामध्ये असशी तू
जादू लाखो मनावर
लाखो शब्द माझे सखी
व्यर्थ तुझ्या असण्यावर

येशील कधी माझ्यासाठी
जाशील अथवा दूरवर
जगतो कविता तुझ्यामुळे
भाग्य मजवर मेहरनजर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २५ जून, २०१४

नकोस विचारू मजला जाऊ का




नकोस विचारू
मजला जाऊ का
हो म्हणता सखी  
ग, येतच नाही |
तुझा निरोपी
चेहरा स्मरता
शब्द मुखातून
फुटतच नाही |
असो सभोवती
तुझी गुणगुण
तयावीण मज
सुचतच नाही |
तव शब्दातील
गोड रुणझुण
आणखी जीवास  
कळतच नाही |
असतो क्षणांचा
वेग अनावर
काळ हळू हळू 
का होतच नाही |
उद्या घडे काय
कुणास ठावूक
हात हातातून   
सुटतच नाही |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

sunnayna.r.patel@gmail.com

मंगळवार, २४ जून, २०१४

तुझा एकच इशारा





जीवना ,
तुझा एकच इशारा
मजला होईल पुरा
अजूनही जगण्याचे
स्वप्न असे माझ्या उरा  
उद्वस्त गढी ही जरी
उध्वस्त असे पसारा
जुनाट भिंतीमध्ये या  
असे अजून उबारा
सावरणाऱ्या हातांची
नि लिंपणाऱ्या मातीची
वाट पाहतो रोज मी
एका नवीन उषेची
फार काही नाही तर
असा कर उपकार
एक रात्र आषाढाची
देई मज धुवांधार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...