शनिवार, १४ जून, २०१४

तशी भूल जीवास सखी







तशी भूल जीवास सखी 
सदैव पडत असते  
चटका बसता पाऊल    
सावली शोधत असते

गैर नसले तरी सारे 
इथे अवघड असते
जुगाऱ्याला जगण्यासाठी   
नवा डाव नशा असते

मातीचाच देह असतो  
माती काही सुटत नाही
रुजतांना सुकलो तरी
जीवनेच्छा मिटत नाही

कुठलीशी ओली झुळूक
श्वासालाही जाग आणते
मरता मरता रोपटे
हात नभात पसरते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/







शुक्रवार, १३ जून, २०१४

स्पर्शून ओठास तुझ्या ... इंदिवर अनुवाद





स्पर्शून ओठास तुझ्या
माझे गीत अमर कर तू   
होवूनिया सखी माझी
माझे प्रेम अमर कर तू  

न वयाची सीमा वा नुरावे जन्म बंधन
जो प्रेम करे कुणी त्याने पहावे केवळ मन
नवी रीत रुढावूनी तू ही रीत अमर कर तू  

आकाशाचे रितेपण माझ्या दाटलेले मनी  
रुनझुनत पैजण तू ये माझ्या जीवनी  
श्वास देवूनि तुझे हे संगीत अमर कर तू


जगाने हिरावले मज जे जे आवडले
सारे गेले जिंकुनिया मज सदा हरविले
तव हरवूनी हृदयास माझे यश अमर कर तू  


कवी ; इंदिवर
अनु . डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in/



एक मोह सावळासा





एक मोह सावळासा 
माझ्या मनात दाटला
रे नभा सांभाळ मला
करून मज सावळा

तीच वेणू गात्रातून
आज पुन्हा सुरावते
प्रिय सखी दूर कोठे
वाट माझीच पाहते

जरा हासता मुग्धशी
ताऱ्यास जाग आणते
आणि वेडे भान माझे
दशदिशात धावते
  
काहीतरी बोलतांना
काही तरी होत होते
मोरपीस डोळ्यावरी
कानी तेच गीत येते

प्राणातील हाक ओठी                
हाकेमध्ये प्राण माझे 
कडाडणाऱ्या विजेचे
भोवताली लोळ भाजे

तीच करुणा सावळी
अन बेभान बिजली
पडू दे हृदयावरी
आग अनावर ओली 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
 
  

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...