जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शनिवार, १ जून, २०१३
शुक्रवार, ३१ मे, २०१३
गोरी बायको कश्यासाठी ?

गोरी बायको कश्यासाठी ?
लोकांनी पाह्ण्यासाठी
आपल्यावर जळण्यासाठी
त्यांना जळतांना पाहून
आपण खुश होण्यासाठी .
गोरी बायको कश्यासाठी ?
समारंभी मिरवण्यासाठी
गर्दीत सांभाळण्यासाठी
सांभाळतांना तिला तसे
गर्दीत हिरो ठरण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
गोरी पोर होण्यासाठी
कष्ट त्यांच्या लग्नाचे
आपोआप टाळण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी ...
असे काही जिरवण्यासाठी
विक्रांत प्रभाकर
त्याने होय म्हणताच
त्याने होय म्हणताच
सर्वांगी हर्ष दाटला
थांब क्षणभर मना
जरा सावरू दे मला
स्वप्नातील स्वप्न असे
दिसे आज जागृतीला
जणू एक मोरपीस
स्पर्शले रे हृदयाला
आज साऱ्या तपस्येचे
पुण्य आले रे फळाला
याहून अधिक काही..
नाही नि नकोच मला
त्याचा हरेक शब्द मी
हृदयामध्ये झेलला
देहातील कण कण
आज वादळ जाहला
हे खगांनो हे फुलांनो
सांगा हे साऱ्या जगाला
प्रकाश अन वाऱ्यानो
पसरा दाही दिशाला
विश्व पुरेना आनंदा
काय करु हृदयाला
त्याने स्वीकारले मला
अर्थ जीवनाला आला
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
गुरुवार, ३० मे, २०१३
कवीराजा (नवरंग १९५८ -भरत व्यास स्वैर अनुवाद)
कवीराजा
करू नकोस उगाच शब्द तोडमोड
काही धंदा कर थोडे पैसे जोड
शेर शायरी तुझी नच कामी येणार
कवितेची वही अन वाळवी खाणार
भाव वाढतो वेगान धान्य महागते भराभर
मरशील उपासाने भुके जागशील रात्रभर
म्हणून सांगतो तुज मित्रा हे सारे सोड
काही धंदा कर थोडे पैसे जोड
चल फेक पेन ते कर बंद काव्यमशीन
बघ रोकड किती घरी नि शिल्लक अजून
घरात उरले किती तूप नि गरम मसाला
किती पापड लोणच अन तिखट मसाला
किती तेल मिरची हळदी नि धने जिरे
कविराजा अन हळूच तू वाणी बन रे
अरे पैशावर लिही काव्य अन गीत भूकेवर
गव्हा वरती गझल होऊ दे शेर धान्यावर
लवंग मिर्ची वर चौपाई तांदुळावर दोहे
कोळश्यावर लिहशील तर वाह क्या बात है
कमी भाड्याच्या खोलीवर लिही कव्वाली
छन छन करती रुबाइ ती पैसेवाली
शब्दांच्या जंगलात खूपच गोंधळ असतो
कवी संमेलन मित्रा भांडण तंटा असतो
मुशायरयाचे शेर सारेच रगडा असतो
पैसेवाला शेर फक्त वाहवा मिळवतो
म्हणून सांगे मित्रा करू नको डोकेफोड
काही धंदा कर थोडे पैसे जोड
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
बुधवार, २९ मे, २०१३
करतात घाण
करतात
घाण रस्त्यात लोक
थुंकतात
घाण जिन्यात लोक
लावूनिया
पाट्या जागोजागी
पाटीवरी
त्या थुंकतात लोक
कधी
गांधीगिरी ती करू जाता
फेकूनि
घाण बोलावतात लोक
कुणाची
घाण काढू किती मी
मलाच
घाण म्हणतात लोक
प्रश्न
कळकळीने जरी मांडला
टाळूनि
मज हसतात लोक
येता
कधी मग शब्दात घाण
पाहुनी
ती का चिडतात लोक ?
अशी
घाण टाकुनी जागोजागी
मनी
घाण का लपवतात लोक ?
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
ओंकारेश्वर ला
ॐकारेश्वर (नर्मदाकाठ च्या कविता ) ******** श्रद्धेचा व्यापार खुळखुळे भक्ती तरी देवा तिथे दिसे तुझी वस्ती इथे पूर्ण होती किती ...
-
पाडगावकर एक असे कवि होते की त्यांचे अन मराठी मनाचे सूर जणू काही एक झाले होते सदाबहार तारुण्याचे वरदान घेवून आलेली ...
-
कृपा (नर्मदाकाठ च्या कविता ) ******* माई तुझी कृपा अनंत अपार चाले पायावर देह माझा ॥ अगा हे चालणे असे तुझे देणे अन्य न मागणे मज...
-
सर **** कधी ओघळेल प्रभू प्रेम सर मनी झरझर तृषार्थ या ॥ कधी ओलावेल मृतिका चित्तीची रुजेल भक्तीची बी बियाणे ॥ कधी विरूढेल ज्ञान...
-
माझी नर्मदा परिक्रमा ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
कृपा तुझी ****** ज्ञानदेवी वृत्ती झाली तदाकार जगाचा विसर पडोनिया आनंद सागरी आनंदाची लाट होवून परत जावे जैसे चालो आता खेळ ...
-
परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा माईकडे मागत आहे प्रचंड पाणी प्रवाहाचे नितळ नि...
-
मला भावनांचं अवडंबर नव्हतं मांडायचं खरतर पण माझ्या डोळ्यास पाझर मला ओढाळ प्रेमावर नव्हतं लिहायचं खरतर ...
-
डुकरांच्या गल्लीतून **************** डुकरांच्या गल्लीतून असे येणे जाणे घरी मग चावणारच डुक्कर कुणा कधीतरी काळी पांढरी हिरवी निळ...
-
भय *** किर्र निर्मनुष्य अश्या जयंती माता जंगलात मऊ मातीत उमटलेली ताजी व्याघ्र पावुले अन् एकटेपणी चाललेली माझी परिक्रमा . वि...
