संत सहवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत सहवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

संत सहवास

संत  सहवास   .
*******
संताची संगत शरद चांदणे
अंतरी भिजणे चिंब प्रेमे ॥ १

संताचे बोलणे छाया घनदाट 
शब्द दावी वाट प्रेम भरे ॥२

देवा तुझी प्राप्ती किती रे कठीण 
परि मी पाहिन वाट युगे ॥३

पण खचताच जीवाचा या धीर 
दाटताच नीर नयनात ॥ ४

तयाविन मज नच रे आधार 
मायबाप थोर कृपावंत ॥५

तुझ्या विरहाचे दु:ख मी साहीन
निश्चिंत राहीन तयामुळे ॥ ६

आधार दिलासा सोबत भरोसा 
तमी कवडसा जीवनी ते॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

श्री वासुदेवानंद सरस्वती

प.प.श्री वासुदेवनंद सरस्वती महाराज **************** आनंदकंदा श्री वासुदेवनंदा  तोडी भावबंधा आमच्या तू देई ज्ञान शक्ती देई भावभक्...