रक्षा बंधन
*********
रक्षिलेस तू सर्वदा दूर धाडूनी आपदा
काचली गाठ तरीही
तोडला न कधी धागा
थोर माझी ही पुण्याई
म्हणून दारी आलो गा
सारी ही तुझीच लीला
कृपासिंधु तू श्रीपादा
तूच बंधू हितकारी
जन्मोजन्मी पाठीराखा
तूच खेळगडी गोड
जीवलग प्रिय सखा
काय मागू तुला आता
जीव प्राण ओवाळला
मिसळूनी ज्योत जावी
ज्योतीत तुझ्या कृपाळा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️