महाशून्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाशून्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

मनशून्य


शून्य
****

मनाच्या गाभारी प्रगटले शून्य 
जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१

मोडले पडले इमले बांधले 
स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२

वात ना प्रकाश रूप ना आकाश 
शब्दांचा प्रवास ठोठावला ॥३

नुरले मागणे नुरले रडणे 
भव भुता भेणे नसलेल्या ॥४

उरले केवळ रूप गुण उणे 
मी पण असणे सर्ववत ॥५

माझ्यात शून्य शून्यात वा मी 
वाहणे ते कर्मी घडू आले ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सार्थ करी दत्ता

सार्थ करी दत्ता ************ विश्वाचे कारण तुच दयाघन  आहे मी जाणून दत्तात्रेया  परी तव कारणे केवळ  जगणे मीपण  सरणे घडेचिना  अशी ...