नारळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नारळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

नारळ


नारळ
****
साधू आले साधू गेले 
थोडे करून नारळ ओले 
भिजली शेंडी करवंटी
काहीतरी काम झाले 

पाणी आतले आत रहीले 
वर ओतले सुकून गेले 
म्हणती कुणी पुण्य फळले 
नारळाचे आयुष्य वाढले 

फुटेल नारळ कधीतरी तो
भाजी चटणी होत कशाची 
पाणी ओतल्या साधूची वा 
सजेल थाळी अन्य कुणाची 

विक्रांत पडून रहा पोत्यात 
बघ नारळ केवळ फुटतात 
कधी सुके तर कधी ओले 
अन्य न देवाजीच्या मनात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

फ्रेम आणि चित्र

फ्रेम आणि चित्र  ************ जेव्हा जेव्हा कानी सखी शब्द येतो  तेव्हा तेव्हा समोर तुझा चेहरा येतो  बाकी छान पैकी चालू आहे जिंदग...