नर्मदा नर्मदा परिक्रमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नर्मदा नर्मदा परिक्रमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

मठ

मठ
****

दिसतात मठ कुठे मोक्यावर 
माई तटावर बांधलेले ॥ १

पेरलेले शेत मग्न उत्पन्नात 
पोटार्थी महंत किती एक ॥२

सुरेख सुंदर सजले मंदिर 
जन धनावर पराधीन ॥३

करती पूजन करती यजन 
व्यवहारी मन रमलेले ॥४

सुटते ना पोट नच सुटे छत
 सुरक्षेचे तट देहाचे या ॥५ .

काय तो वाईट आहे रे संसार 
जीवन स्वीकार असलेला ॥६

विक्रांत पाहतो असाही पसारा 
मायेची ही तऱ्हा विलक्षण ॥ ७

आणि चाले पुढे आपुलिया वाटे 
चुकवित काटे मुकाट्याने ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

डॉ. मनीष दोशी Dy MS राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)

डॉ. मनीष दोशी राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त) ***************** खर तर तुम्हाला सांगायची गरज नाही डॉ.मनीष, हे एक विलक्षण ...