रविवार, १९ जुलै, २०१५

किती केल्या वाऱ्या तरीही








किती केल्या वाऱ्या तरीही
मना वाट सापडत नाही
सालो साल पडते पाणी
आग तरीही विझत नाही

बैल थकले बैल मेले
गाडी ओढी नवी खिलारे
मनी दाटले भाव ठरले
ब्रह्मा भेटी जग चालले

ओहो रंगले शब्द दंगले
टाळ चिपळ्या नादामधले
काय खुमारी वर्णू देवा
वैकुठासी हातच टेकले

माझे मीपण सदैव झिंगले   
आणि वस्त्र फाटू लागले
आता लाज कशी बाळगू
सारेच बहाणे व्यर्थ गेले

चाल चालून आजा मेला
त्याला हिशोब नाही कळला
बापालाही तिच नशा अन
भोके सदैव सदऱ्याला

काय करावे कसे वेगळे
डोळे तिथेच खिळलेले
डोई भणभण पावुल चाले
प्रश्न अंगठा तुटलेले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



बुधवार, १५ जुलै, २०१५

खरतर






मला भावनांचं अवडंबर
नव्हतं मांडायचं खरतर
पण माझ्या डोळ्यास पाझर

मला ओढाळ प्रेमावर
नव्हतं लिहायचं खरतर
पण माझ्या हृदयी थरथर

मला अगदी दूरदूरवर
राहायचं होतं खरतर
पण माझे मन नाचरं

तुला गुपित हळूवार
नव्हतं सांगायचं खरतर
पण माझं गाणं फितूर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, १३ जुलै, २०१५

खेळ..






जितुके मी
जवळ यावे     
तितुके तू  
दूर जावे  

का रे असे  
खेळ खेळशी 
आणि कुठवर
मजला छळशी 

इथे धाडसी  
तिथे पाडसी
प्राण कंठात
उगा आणसी   

असा सदा मी
तुज बोलावतो
व्याकूळ होत
साद घालतो

तुजला नाही 
भान कश्याचे
नाट्य सदा 
का दुराव्याचे

आता खेळ   
असा डाव  
तुच भोज्या
तुच धाव  

तुच शोध   
तुझा तुला   
रे माझ्या  
या मनातला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...